Home > मॅक्स स्पोर्ट्स > मुलींच्या ज्युनिअर, सब-ज्युनिअर रस्सीखेच स्पर्धेचा समारोप

मुलींच्या ज्युनिअर, सब-ज्युनिअर रस्सीखेच स्पर्धेचा समारोप

मुलींच्या ज्युनिअर, सब-ज्युनिअर रस्सीखेच स्पर्धेचा समारोप
X

१९ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर, सब- ज्युनिअर रस्सीखेच स्पर्धेचा आज मुंबईत समारोप झाला. महाराष्ट्र ़टग ऑफ वॉर असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. मुंबईतील अंधेरी येथील कमलादेवी जैन महाविद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूृर, परभणी आणि नागपूर अशा एकूण ९ जिल्ह्यातील २१ संघांनी यात सहभाग घेतला होता. स्पर्धेचं उद्घाटन वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या हस्ते झालं तर स्पर्धेचं पारितोषिक वितरण कॉंग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांच्या हस्ते पार पडलं. एकूण चार विविध वजनी गटासाठी या स्पर्धेत सामने खेळवले गेले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत.

३६० कि.ग्रॅ.वजनी गट- १.मुंबई शहर,२.नागपूर, ३.सोलापूर

४०० कि.ग्रॅ.वजनी गट- १.नागपूर २.सोलापूर ३.अहमदनगर

४४० कि.ग्रॅ.वजनी गट- १.नागपूर, २.मुंबई, ३.ठाणे

४६० कि.ग्रॅ.वजनी गट- १.मुंबई शहर, २.अहमदनगर, ३.ठाणे

Updated : 12 Nov 2017 4:17 PM GMT
Next Story
Share it
Top