Home > मॅक्स स्पोर्ट्स > मंत्री महोदय आणि बेटिंग

मंत्री महोदय आणि बेटिंग

मंत्री महोदय आणि बेटिंग
X

भारताच्या क्रिकेट नकाशावरील स्वत:चे स्थान हरवून बसलेले अर्थात ‘राजस्थान’ राजा महाराजांचे साम्राज्य - किल्ले सौंदर्य ते थेट वाळवंट. रजपूत आपल्या वाणीचे पक्के, परंतु मुघलशाहीचे खानदानी तीनशे पेक्षा जास्त वर्षाचे गुलाम.

गरिबीचा स्पर्श न झालेला मारवाड. राजा महाराजांनी दिलेला क्रिकेट खेळास आश्रय केलेला प्रचार-प्रसार व योगदानास तोड नाही. याच राजस्थानच्या क्रिकेटचे ललित मोदी आणि कंपनीने धिंडवडे काढले व राजकारण्यांना प्रकरणात गुंतवून आज तरी इंग्लंडवासीय आहे.

यातून राजस्थानच्या एका मंत्र्याने प्रेरणा घेऊन जयपूर हे मुख्यालय ठेवून ‘राजपुताना क्रिकेट लीग’ नावाची टी२० स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेची आयसीसी एशियन क्रिकेट काऊंसील तसेच भारतीय क्रिकेट मंडळास साधी कल्पनाही देण्यात आलेली नव्हती. स्पर्धेतील खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या कपड्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा लोगो होता.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपले पूर्वीचे वैभव धुळीस मिळवलेले आहे यात शंकाच नाही. टोप्या – कपडे, जे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करताना मोठ्या अभिमानाने परिधान करतात नि मंडळाकडून यासाठी छोटेखानी समारंभही केला जातो, हे सर्व फूटपाथवर विकले जात आहे. मंडळास मात्र याचे देणेघेणे नाही.

हे सामने अनुक्रमे दिल्ली-नोईडा हैद्राबाद, काठमांडू (नेपाळ) या ठिकाणी खेळविण्यात आले. स्पोर्टस्‌ चॅनलच्या मान्यवर समालोचकांची, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची वर्दळ होती.आंतरराष्ट्रीय तसेच एशियन क्रिकेट लीग म्हणूनही या स्पर्धेचा उल्लेख होत होता. स्पर्धेतील पाचवा-सहावा सामना नेपाळमध्ये होता. तेथील ‘जनता चॅनल’ने राजस्थान मंत्र्यांचे बिंग फोडले. अजमेर-भिलवडा या दोघांतील अंतिम सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला होता. मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने बुकींनी आपला बेटिंगचा धंदा करोडोंवर पोहोचवला होता.दरम्यान जयपूर पोलीस चार दिवस या बुकींचा मागोवा घेतच होते. दोघांना पकडून हातकड्या ठोकल्या. हरियाना पोलिसांनी त्यांच्याकडे कार्यवाही करून १४ जणांना बेड्या घालून सर्व हस्तगत केलं.

क्रिकेटमध्ये असे होणे शक्य नाही; आंतरराष्ट्रीय शंभरी गाठलेल्या कर्णधारास जे सुचणार नाही ते मंत्री महोदयांनी आपल्या हस्तकांना विशिष्ट स्वरूपाच्या सूचना देऊन खेळाचा नव्हे तर पैशाचा विषय साकार करून दाखविला.

मॅचफिक्सिंगचे उदाहरण

शेवटचे षटक. संघास विजयासाठी १२ धावांची गरज असताना गोलंदाजाने २ वाईड बॉल टाकले. एक वाईड एवढा बाहेर टाकण्यात आला की यष्टीरक्षकाच्या अडवण्यापलीकडे होता. सीमापार. नंतर नो बॉल टाकण्यात आला १ धाव अधिक फ्री हीट १ चौकार व १ धाव धावून काढून संघास विजयी करून दाखविण्याची किमया राजकारण्याने केली.

सामन्यानंतर आयपीएल कमिशनर राजीव गुप्तांनी आपली प्रतिक्रिया देताना हा राज्य संघटनेच्या अंतर्गत येणारा विषय आहे असे सांगून पोबारा केला. विनयकुमार एसीएससीचे सचिन यांनीही हात वर केले.

राष्ट्रीय चॅनल ‘टाईम्स पाक’ने हे वृत्त २१ जुलै सायंकाळी ६ वाजता प्रदर्शित केले व विषयाचा पाठपुरावा केला. दैवाची साथ लाभल्यास दिल्लीकरांच्या शुभेच्छाही लाभतात अन्यथा‘तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पाहावे.’

अशा बातमीसाठी प्रादेशिक वाहिन्या उपलब्ध नाहीत का? क्रिकेटवरील सट्टा आता अधिकृत होण्याच्या मार्गावर आहे. इंग्लंडमधील संबंधितांशी वरिष्ठ पातळीवर विचारांची देवाण-घेवाण सुरू आहे. तोपर्यंत तरी अतिउत्साही मंडळी थांबतील का... त्या वेळेची वाट पाहू शकतील का?

फुलों का - तारों का सबका कहना है ।

एक हजारों में हमारा क्रिकेट है ।

सारी उमर हमें संग रहना है ।

फुलों का - तारों का सबका कहना है ।।

अभय गोवेकर

Updated : 8 Sep 2017 10:25 AM GMT
Next Story
Share it
Top