Home > मॅक्स स्पोर्ट्स > भ्रष्टाचाराचा इतिहास रचणारे पदाधिकारी

भ्रष्टाचाराचा इतिहास रचणारे पदाधिकारी

भ्रष्टाचाराचा इतिहास रचणारे पदाधिकारी
X

विनोदाच्या भांडारातील आणखी एक क्रिकेट किस्सा. राष्ट्रीय निवड समितीचा थेट अध्यक्ष होणे तेसुद्धा कुणाच्या ध्यानीमनी नसताना, हेही घडले. हे नाव चर्चेतलं नाही, राज्य संघटनेचाही भाग नाही परंतु करोडोपर्यंत मानधन मिळणार असेल तर खेळ-खेळाडूंची कारकीर्द संपवण्यास कोणता माजी क्रिकेटपटू तयार होणार नाही? त्यात मुंबईकराची निवड केली गेली असल्यास सोने पे सुहागा.

काहीजण म्हणतात, उघडा डोळे पहा नीट. नीट न दिसणाऱ्यांसाठी गॉगल्स असतात. पण नीट दिसूनही दृष्टीहीन असल्याचे सोंग करणाऱ्यांसाठी खास दुर्बीण व लाल-पांढरा, घंटी असलेला दांडा ही योजना राबवणाऱ्यांचे खास मेहमान... नमूद केलेल्यासकट विकलांग केवळ यांच्यासाठी एका गावठी चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत, नंतर सक्तीने निवृत्ती देणं यामुळे ओढवून घेतलेली कायमची बंदी. खासगी क्लबचा केनिया दौऱ्यात लक्ष्मीपुत्र- धनदांडगे क्रिकेटप्रेमी, शौकीन प्रशासक याच्याशी आलेल्या संबंध-संपर्कातून त्या देशाचे प्रशिक्षकपद मिळवले/ विश्वचषकात संघ सेमीफानलपर्यंत तो खेळाडूंनी केलेल्या मैदानातील कामगिरीमुळे, प्रशिक्षक तर तंबूतच... त्याची भूमिका ती काय असणार? साखर- पुड्यातील खाऊन देणाऱ्याच्या हातात पुडा देणे ही अनेक खेळाडूंची अनुकरण केलेली सवय असते.

ज्या प्रशिक्षकास प्रशिक्षण कार्याचा अनुभवच कोणत्याही स्तरावरील नाही- अशांची नियुक्ती व कायमची मुक्ती. त्यानंतर आजवर केनिया हा देश क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या नकाशावर नाही. ही कशाची नांदी? केनिया म्हणते, “झूट बोले कौआ काटे- काले कौए से डरिओ – मैं खेलना छोड दूंगा तुम देखते रहिओ...” तत्कालीन मंडळाच्या अध्यक्षांच्या गावी मनोमीलन भेट वास्तव्य बऱ्याच काळासाठी, भारतीय संघातील द्रवीड- तेंडुलकर- लक्ष्मण- सेहवाग- गांगुली यांच्यासारख्या कर्तृत्ववान खेळाडूंना एकतर संघातून डच्चू देणे अथवा पूर्ण कल्पना देऊन निवृत्त होण्यास प्रवृत्त करणे एकंदरित हे खेळाडू भारतीय संघात यापुढे दिसणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेऊन सावधानता बाळगून कृती करणे. ज्यास संघनायकाची संपूर्ण साथ तसेच पाठिंबा हे सर्व घडवून आणण्याची सुपारी घेऊन मुंबईकराने घेतली व करून दाखवले. पण यासाठी लागणारी अध्यक्षपदाची खुर्ची – अधिकारप्राप्ती करून घेऊन भरघोस मानधन याची सोय करवून घेऊन इतिहास रचला. राजकारण कटुनीतीचा जय झाला.

अशी आहे राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षांची किमया. त्यांच्या सोबतचे शिलेदार होय महाराजा म्हणून साथ देणारे. व बोंबलणारे, “हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं – हम तेरे तेरे तेरे चाहने वाले हैं...”

या अध्यक्षाचा खेळाडू म्हणून जरी भारतीय संघातील प्रतिनिधी म्हणून कामगिरीचा विचार केल्यास तर आकडेवारी पलंदाजीतील काही फारशी चमक प्रदर्शित करीत नाही. क्षेत्ररक्षणात तर राखीव खेळाडूची नियमात सोय असती तर यास जास्त फायदा करून घेता आला असता. असे क्षेत्ररक्षण, सायकल, स्कूटर अशी दुचाकी वाहनांची व्यवस्था करून चेंडूपर्यंत जाऊन अडवण्याची खास मुभा देण्याची तजवीज करावयास लागली असती. चेंडू यष्टीरक्षक किंवा गोलंदाजाकडे अनुक्रमे अंडर आर्म, साईड आर्म तसेच ओव्हर आर्म – पिक अप अँड थ्रो करण्याची क्षमता खांद्यात नव्हती. शालेय – विद्यापीठ जीवनात थोडीफार गोलंदाजी केलेली आहे परंतु झुमरीतलैयामधून धावत येऊन कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली... प्रमाणे चेंडू टाकतानाची परिस्थिती होती. दैव बलवत्तर म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी. नाहीतर याच्यापेक्षा अनेक चांगले होते. त्यांना प्रतीक्षा करूनही झुकते माप मिळाले नाही. नशीब बलवत्तर तर गधा पेहलवान. फलंदाजी करताना डोक्यात चेंडू घेतला तर तो तज्ज्ञ होतो, हे खरे.

अशा निवड समिती सदस्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आयन चॅपेल- मुंबई- पश्चिम विभागाचा कप्तान कै. अशोक मांकड यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व हवे की जे निवज समितीस संघ निवडण्याची संधीच देत नव्हते. मैदानात मी संघनायक असल्याने मला हवे असलेले खेळाडू मला मिळालेच पाहिजेत अशी ठाम भूमिका ठेवून आपल्या संघातील खेळाडूंची नावे स्वत:च्याच अक्षराने समितीत सादर करून पूर्ण मान्यता मिळवीत होते.

कै. लाला अमनाथ भारताचा एक महान अष्टपैलू कसोटीपटू. संघाचा कर्णधार, शतकानेच आपली कारकीर्द सुरू करणारा एक अव्वल फलंदाज. जगातील कोणत्याही देशाच्या खेळपट्ट्यांचे सखोल ज्ञान असलेला एकुलता एकच.

कसोटी क्रिकेटच्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी, पाचव्या व अंतीम दिवसाच्या निकालाचे भाकीत करणारा एकमेव. महाराजा ऑफ विजयनगरम यांना आपल्या तिखट, झणझणीत भाषेत खडे बोल सुनावणारा खेळाडू, ज्याने भोगलेली शिस्तभंगाची कारवाई व ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परत यावयाची तयारी असे व्यक्तिमत्त्व. भारतीय संघ कसा असावा! तो निवडण्याची प्रक्रिया मानणारा एक महान योगी. स्वत: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवीत असताना त्या काळी त्यांना टेटवे- म्हैसुर या संघाचे प्रतिनिधित्व करणारा कै. बुद्धिसागर कृष्णप्पा कुंदरन हा यष्टीरक्षक व कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करणारा त्यांच्या चाणाक्ष नजरेस पडला व लालाजींनी त्याला थेट इंग्लंड विरुद्धचा मद्रास कसोटीत खेळविले.

या खेळाडूने लालाजींचा विश्वास सार्थ ठरवून 192 धावांची खेळी करून मग पाठी वळून कधीच पाहिले नाही. आपल्या पूर्वीच्या निवड समितीचा खेळखोळांबाचा फटका कुंदरनलाही बसला. 1966च्या इंग्लंड दौऱ्यात त्याने भारतास कायमचा इंग्लंडवासी झाला. अशी निवड समितीने घेतलेल्या बळींची संख्याही विक्रमी असेल. असे लालाजी आपणास पुन्हा पहावयास मिळतील का? बरेच कसोटीपटू इतरत्र देशात स्थायिक झालेले आहेत. कारणे स्पष्ट नजरेस पडतात. “हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते. मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना...”एवढेच म्हणू शकतो. भारतीय क्रिकेटचा यापूर्वीचा अंदाज घेऊन श्री गुलाम अहमद यांचा भाचा आसीफ इक्बाल पाकिस्तानात जाऊन त्या देशाचा कर्णधार झाला. गुलाम अहमद भारतासाठी कसोटी क्रिकेट तसेच मंडळाचे सचीव म्हणून प्रशासनाचा कारभार केला परंतु आसिफला परावृत्त करू शकले नाहीत. तो इथे असता तर कसोटी क्रिकेटपटू झाला असता का?!

पाकिस्तानचा माजी कर्णधार सुसंस्कृत- सुशिक्षित इंग्लंडमधून तेथील विद्यापीठाचा पदवीधर जागतिक स्तरावरील तेजगती गोलंदाज तसेच उत्कृष्ट फलंदाजीतून अष्टपैलुत्व सिद्ध करणारा महान खेळाडू तसेच आमचा पाकिस्तानचा भावी पंतप्रधानपदाचा उमेदवार अगदी भक्कम दावेदार याने वसीम अक्रम, वकार युनुस, इंझमाम उल हक, अब्दुल कादिर यांसारखे अनेक हिरे-मोती घडवून पाकिस्तानास दिले, या कार्याला तोड नाही.

संघनायक सौरव गांगुलीने वीरेंद्र सहवाग, युवराज सिंग, आशीश नेहरा, महंमद कैफ, झहीर खान, हरभजन सिंग असे मोहरे घडवले. त्यांच्या कर्तृत्वावर ते मोठेही झाले. गांगुलीच्या या धारदार नजरेचे तसेच योगदानाचे कौतुक होणे गरजेचे आहे. या गुणी व्यक्तिमत्वाचा नियामक मंडळ त्यांच्या कार्ययोजनांमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती तर केली आहेच. परंतु त्याचा मान व मन जपून त्याच्या अनुभवाचा भारतीय क्रिकेटसाठी फायदा करून घेतला तर भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णयोग येईल. रसिक म्हणतील “शोला जो भडके, दिल मेरा धडके... दर्द जवानी का सताये बढबढ के...”

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता निवृत्त झालेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व त्यांना लाभलेले प्रशासकीय याच प्रक्रियेतील सहकारी यांच्या देखरेखीखाली हाकले जात आहे. त्यांच्या सुव्यवस्थेस यश लाभो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आज त्यांचा प्रशासकीय कारभार पारदर्शक असावा, असे म्हणते. तर त्यांनी मुलाखत सत्र आयोजित करून सदस्य निवडावेत. या वेळी सदस्य, मीडिया प्रतिनिधी उपस्थित असावेत. म्हणजे जे घडत आहे ते देशाच्या जनतेसमोर येईल.

देशाचे ते अप्रत्यक्षरीत्या प्रतिनिधित्व करीत असल्याने आरंभ तोंडी मुलाखतीने करून पात्रता कळण्यासाठी ते ज्या विभागातून येतात उदा. पश्चिम हा आपला विभाग, ज्यात अनुक्रमे मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, सौराष्ट्र व बडोदे असे पाच राज्य क्रिकेट असोसिएशनचे संघ रणजी व दुलिप राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेले दिसतात. विभागीय दुलीप व इतर स्पर्धांची नावे घेऊन त्यातील कामगिरीनिहाय नावे घेत त्यांच्या जाहीर मुलाखती घ्याव्या. यावरून उमेदवार देण्यात येणारी महत्त्वाची जबाबदारी तेही कळेल व व्यवहार पारदर्शक होईल.

इतर चार उमेदवार पूर्व- दक्षिण – उत्तर व मध्य यांतील स्पर्धा –खेळाडूंची माहिती देतील. मूल्यांकनासाठी श्री. टी. ए. शेखर यांना घ्यावे. हे व्यक्तिमत्त्व असे की होतकरूंची नावे त्यांना तोंडपाठ असतात. मद्रास दक्षिण विभागाचे प्रतिनिधी असलेले शेखर हे माजी कसोटीपटू. त्यांना देशासाठी योगदान देता आले नाही. त्यांनी अनेकांना पुढे आणले पण त्यांना संधी मिळाली नाही. एमआरएफ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उत्तम प्रशिक्षणाचा धडा घालून दिला व श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, झहीर खान सारखे गोलंदाज तयार करून दिले. याशिवाय श्रीलंकेचा चमिंडा वास, ऑस्ट्रेलियाचा जॉनमन अशीही नावे घेता येतील. जगभरातील द्रुतगती गोलंदाज या मद्रासच्या मातीत घडले. प्रशिक्षण कसे असावे, शिस्तबद्ध काम म्हणजे काय ते या संस्थेकडे पाहून शिकावे.

-अभय गोवेकर

Updated : 25 Aug 2017 6:53 AM GMT
Next Story
Share it
Top