Home > मॅक्स रिपोर्ट > अभिनंदनचे फेक अकाऊंट

अभिनंदनचे फेक अकाऊंट

अभिनंदनचे फेक अकाऊंट
X

सोशल मिडीयावर जर तुम्ही अभिनंदन वर्थमान यांना फॉलो करत असाल तर सावधान… सोशल मिडीयावरील अभिनंदन यांचे सर्व अकाऊंट फेक आहेत. अभिनंदन यांच्या अकाऊंट वरून भारतीयांना धन्यवाद, संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांच्याशी भेट अशा पद्धतीच्या पोस्ट प्रसिद्ध केल्या गेल्या होत्या. मात्र हे सर्व अकाऊंट बोगस असल्याचं सरकार तर्फेच सांगण्यात आलं आहे.

कुठलीही व्यक्ती, संस्था किंवा घटना चर्चेत आली की त्याचा फायदा उचलण्याचा फायदा सोशल मिडीया मार्केटींग मधले तज्ज्ञ तसंच काही असामाजिक तत्व करत असतात. अभिनंदन यांच्या नावांचे फेक अकाऊंट हा त्यातलाच प्रकार आहे. त्यामुळे जर तुम्ही हे अकाऊंट फॉलो करत असाल तर लगेच अनफॉलो करा.

Updated : 3 March 2019 5:23 AM GMT
Next Story
Share it
Top