मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या खरंच 75 हजारांवर जाणार का?

183
Courtesy: Social Media

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मे महिन्यात ७५ हजारांपर्यंत वाढू शकते. हा अंदाज व्यक्त केलाय, मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय टीमने. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची सद्य स्थिती आणि रुग्णांची वाढणारी संख्या याचा अभ्यास करून केंद्रीय टीमने हा अंदाज व्यक्त केलाय.

मुंबई महानगरपालिकेच्या एका सिक्रेट रिपोर्टमध्ये केंद्रीय पथकाच्या अंदाजाबाबत माहिती देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने २४ एप्रिलच्या आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनलीये. केंद्र सरकारने कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या, मृत्यूचं प्रमाण यावर राज्य सरकारला सूचना करण्यासाठी गेल्या आठवड्यात केंद्रीय पथक मुंबई आणि पुण्यात पाठवलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत या पथकाने चर्चा केली. या चर्चत केंद्रीय पथकाने आपला अंदाज वर्तवला आहे.

मुंबई महापालिकेच्या रिपोर्टनुसार, 

केंद्रीय टीमचा अंदाज मे महिन्याच्या शेवटी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ७५,००० पोहोचण्याची शक्यता. यात, १२,००० लक्षणं दिसून आलेले रुग्ण असतील. तर, ६३,००० लोकं असिप्टोमॅटीक म्हणजे लक्षणं दिसून न येणारे असतील.

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. तर, पालिका प्रशासनाला सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
पालिकेचा प्लान लक्षणं दिसून येत असलेल्या रुग्णांसाठी लक्षण दिसून येत असलेल्या रुग्णांना कोव्हिड-१९ रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

सद्य स्थितीला मोठ्या रुग्णालयात ७,५०० बेड्स आहेत. सर जे.जे रुग्णालय, जीटी आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२५० आयसीयू बेड्स सद्य स्थितीत उपलब्ध. ५०० अजून बेड्स सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये वाढवणार
रुग्णालयातील रिक्त बेड्स १९१६ या सेंन्ट्रल हेल्पलाईन नंबरच्या मदतीने रुग्णांना दिले जाणार.

लक्षणं दिसून न येणाऱ्या रुग्णांसाठी

लक्षणं दिसून न येणाऱ्या रुग्णांसाठी खास व्यवस्था सद्य स्थितीत शहरातील हॉटेल, लॉज, लग्नाचे हॉल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यामध्ये २५ हजार बेड्स उपलब्ध शहरातील ३५० पालिका शाळात ३५,००० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार
लग्नाचे हॉल आणि जिमखान्यात २०,००० बेड्सची व्यवस्था

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केंद्रीय टीमने व्यक्त केलेल्या अंदाजाबाबत विचारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री म्हणाले, “हे एक मॅथेमॅटीकल मॉडेल आहे. या मॉडेलच्या माध्यमातून काही आकडेमोड करण्यात आली आहे. जरूर यामागे सायन्स असतं. यात काही गृहीतं धरलेली आहेत. मात्र, जनतेने घाबरून जावू नये. राज्य सरकार सर्वतोपरी सज्ज आहे.”

हे ही वाचा…


ग्राउंड रिपोर्ट : मजुरांची ‘हायवे’ पायवाट आणि पोलिसांची नाकाबंदी !

 

CoronaVirus: महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 10 हजारांच्याजवळ, 432 रुग्णांचा मृत्यू…

स्पेशल रिपोर्ट – रॅपिड टेस्ट किट खरेदीत घोटाळा? जबाबदार कोण?

मुंबई आलेल्या केंद्रीय टीमने राज्य सरकारला काही सूचना केल्या होत्या. याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या,

“केंद्रीय टीमने धारावी, गोवंडी आणि वडाळ्याचा दौरा केला. धारावीत लोकं सार्वजनिक स्वच्छतागृह वापरतात. त्यामुळे जागा निश्चित करून पोर्टेबल टॉयलेट लावण्याची सूचना करण्यात आली आहे. २-३ हजार लोकांसाठी इन्स्टिट्युशनल क्वॉरेंन्टाईनचा वापर करण्याची सूचना करण्यात आलीये.”

मुंबई महापालिकेच्या रिपोर्टनुसार,

१२ एप्रिलपर्यंत
६२ टक्के रुग्णांचे मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत झाले
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ३० टक्के रुग्ण लो इनकम ग्रूपमधील म्हणजे गरीब
३२ टक्के मृत्यू चाळीत राहणाऱ्यांचे
मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग आणि न्यूमोनिया सारख्या आजारांनी मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या
२०१७- ७२९
२०१८- ८८३
२०१९- ९३७
२०२० (आत्तापर्यंत) – ५९५

सद्य स्थितीला राज्याचा मृत्यूदर ४.२ टक्के आहे. तर, मृत्यू होणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये ७९ टक्के रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग यांसारखा आजार होते. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “सद्य स्थितीला राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के आहे. एप्रिलच्या सुरूवातीच्या तूलनेत मृत्यूदर कमी झालाय. २६९ कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं विश्लषण केल्यानंतर ५० वर्षाखालील व्यक्तींचा मृत्यूदर कमी झाल्याचं आढळून आलं आहे. तर, २१ ते ३० वर्ष वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर ०.६४ टक्के आहे. मात्र, ६१ ते ७० वयोगटातील व्यक्तींचा मृत्यूदर १७.७८ टक्के आहे.”

आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. धारावीत कोरोनाग्रस्तांची संख्या ३३० वर पोहोचलीये. तर १९ रुग्णांचा मृत्यू झालाय. धारावीतील १.२५ लाख लोकं सद्य स्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये राहात आहेत.
मुंबई महापालिकेचं मिशन धारावी हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्टना शोधून स्टॅम्प करावं.

हाय रिस्क कॉन्टॅक्ट इन्स्टिट्युशनल क्वॉरेंन्टाईन
प्रत्येक भागात फिवर कॅम्प
लक्षणं दिसून येणाऱ्या सर्वांना न्स्टिट्युशनल क्वॉरेंन्टाईन करावं
झोपडपट्टी सील करावी. बॅरिकेडिंग करावं
सार्वजनिक स्वच्छतागृह दिवसातून दोन वेळा स्वच्छ करावीत
धारावीतील कंटेनमेंट प्लान
कंटेनमेंट झोन- ५
हाय रिस्क झोन- ५
कंटेनमेंट भागातील लोकसंख्या- १.२५ लाख
४७,५०० लोकांची तपासणी