Home > मॅक्स रिपोर्ट > सनातनवर येणार बंदी?

सनातनवर येणार बंदी?

सनातनवर येणार बंदी?
X

महाराष्ट्र सरकारने आता सनातनवर बंदी आणण्याचा नव्याने प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी दिलीयं. या अगोदर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने पाठवलेल्या प्रस्तावात तृटी असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्य सरकारने नवा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून या अगोदरच्या सरकारने पाठवलेला प्रस्ताव सरकारकडे पडून असल्याचे केसरकर यांनी सांगितले. ATS नेच सर्व माहिती CBI ला दिली असून ATS च्या कामगिरीचा सरकारला अभिमान असल्याचे ते म्हणाले.

विरोधकांचा आरोप

नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेले लोक सनातन संस्थेशी संबंधित असून त्यांचा राज्यात घातपात करण्याचा कट होता असं मत विधानसभा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी मांडलंय. 'सनातनवर बंदी घाला अशी मागणी आम्ही गेले दोन वर्ष करतोय...मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एटीएसचे हात बांधले आहेत, सनातनवर कारवाई होऊ नये यासाठी दबाव टाकला जातोय', असा आरोपही विखे पाटलांनी केला आहे. याबाबत कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटणार असून सनातनचे प्रमुख जयंत आठल्ये यांना अटक करण्याची मागणी विखे पाटलांनी केले होते. मात्र विरोधी पक्षांनी केले सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत केसरकर यांनी हे विरोधकांचे आरोप फेटाळले.

Updated : 20 Aug 2018 5:07 PM GMT
Next Story
Share it
Top