Home > मॅक्स किसान > कर्जमाफी कुणाला मिळाली ?

कर्जमाफी कुणाला मिळाली ?

कर्जमाफी कुणाला मिळाली ?
X

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेअंतर्गत ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचा दावा मोठा गाजावाज करून राज्य सरकारनं केला. मात्र, हा दावा किती खरा-खोटा याबाबत मॅक्स महाराष्ट्रनं जेव्हा मराठवाड्यातील दुष्काळाचा ग्राऊंड रिपोर्ट केला तेव्हा सरकारच्या दाव्यातील सत्य समोर आलं आहे.

पाण्याअभावी ५ एकर ऊस जळाला

उमेश शेंडगे हे बीड जिल्ह्यातील सौंदाणा इथले शेतकरी आहेत. शेंडगे यांनी गेल्यावर्षी आपल्या पाच एकर शेतीमध्ये ऊसाची लागवड केली होती. मात्र, दुर्देवानं दुष्काळ पडला आणि ऊसाचं पूर्ण पीकचं जळून गेलं.

५० हजारांचा खर्चही वाया गेला

शेंडगे यांनी आपल्या पाच एकर शेतात ऊस लावला. त्यासाठी त्यांना ५० हजार रूपयांचा खर्च आला. मात्र, पाणी नसल्यानं शेतातील अख्खा ऊसच जळून गेलाय. त्यामुळं यावर्षी उत्पन्न काहीच मिळणार नाही. दुष्काळ नसता तर किमान ३ लाख रूपयाचं उत्पन्न मिळालं असतं, असं शेंडगे यांनी सांगितलं.

सरकारकडून मदतीची अपेक्षा

डोळ्यादेखत ५ एकर ऊस जळाला आणि शेंडगे कुटुंबिय हतबल होऊन पाहण्यापलिकडे काहीच करू शकलं नाही. अशा परिस्थितीत सरकारनं हेक्टरी किमान ५० हजार रूपयांची मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा शेंडगेंनी व्यक्त केलीय. उभं पीकच जळून गेल्यानं आता कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, असा यक्षप्रश्न शेंडगे यांच्यासमोर उभा ठाकलाय.

कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही

राज्य सरकारनं मोठा गाजावाजा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमानी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जमाफीचा कुठलाही लाभ मिळाला नसल्याचं उमेश शेंडगे यांनी सांगितलं. या कर्जमाफीच्या योजनेसाठी रितसर अर्जही केला होता. मात्र, कुठल्याच प्रकारची कर्जमाफी झाली नसल्याचं शेंडगे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.

Updated : 13 Feb 2019 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top