Home > मॅक्स रिपोर्ट > अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का ?- सुप्रिया सुळे

अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का ?- सुप्रिया सुळे

अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का ?- सुप्रिया सुळे
X

महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाने भाजप आमदार राम कदम वादाच्या भोवर्यात अडकलेत. त्यांच्या वक्तव्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आमदार राम कदमांच्या वक्तव्यावर चांगलीच टिका केली. “ महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेंशी आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना खडसावले. पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार महिलांना आणि मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. मात्र, संघर्षाची वेळ आल्यास हीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य यावेळी सुप्रिया ताईंनी केले. तसेच याबाबत अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का ? जवाब दो, असेही आव्हान सुप्रिया ताईंनी केले.

Updated : 7 Sep 2018 6:33 AM GMT
Next Story
Share it
Top