Home > Election 2020 > मोदींनाही नाकारलेले मतदार 

मोदींनाही नाकारलेले मतदार 

मोदींनाही नाकारलेले मतदार 
X

लोकसभा 2019 चे निकाल नुकतेच जाहीर झाले. भाजपप्रणीत आघाडीला देशात पुर्ण बहुमत प्राप्त झाले आहे. काँग्रेसला या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्रात देखील भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. पण या निवडणुकीत दोन्ही पक्षाला नाकारणारा एक मोठा वर्ग पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे.

आपली निवडणुक केवळ जिंकणारा आणि हारणारा यामध्येच मर्यादीत नाही तर या निवडणुकीमध्ये नोटा (None Of The above ) हा पर्याय देखील लोकांना खुला आहे.

आपण महाराष्ट्राचं चित्र पाहीलं तर नोटाला लोकांनी एकुण 4,80,266 इतकी मते दिली आहेत. जवळपास 24 मतदार संघ असे आहेत जिथे नोटाला 10,000 पेक्षा जास्त मतदान झाले आहे. या मतदारसंघामध्ये 14 मतदार संघ हे आदीवासी संख्या जास्त असलेले मतदारसंघ आहेत. या आदीवासी मतदारसंघांमध्ये नोटाला तब्बल 1,65,158 इतके जास्त मतदान झाले असुन यातल्या तीन मतदारसंघांनी 20,000 चा आकडा क्राॅस केला आहे. पालघर 29479,गडचिरोली चिमुर 24,599 , ठाणे 20426

उर्वरीत आदिवासी मतदारसंघामध्येदेखील नोटाला भरभरुन मतदान झाले आहे.

रायगड 11490 , चंद्रपूर 11377 , पूणे 11001, जळगाव 10,332 , नाशिक 6,980 , अमरावती 5322 , अ.नगर 4072 , यवतमाळ वाशिम 3966 , धुळे 2475, नांदेड 1714.नंदूरबार 21,925

पालघर आणि गडचिरोली चिमुर येथे सर्वाधिक नोटा वापरला गेला आहे.

आदिवासी भागातील 1,65, 158 लोकांनी दोन्ही सरकारला नाकारलेले आहे. याचा अर्थ लोकांचा या दोन्ही पार्टी आपले प्रश्न सोडवण्यास सक्षम नाहीत असे दिसुन येते. यातल्या पहिले दोन जिल्हे (पालघर गडचिरोली ) दुर्गम आहेत. या भागातील नागरीकांच्या अनेक समस्या आहेत. आरोग्य शिक्षण रोजगार भौतिक सुविधा शेती यांसह इतर मुलभुत प्रश्नावर काम करायला आत्तापर्यंतची सरकारे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यातल्या गडचिरोलीत तर दर निवडणुकीत हा आकडा वाढत आहे. ये भागात नक्षलवाद ही समस्या आहे. अशा अवस्थेत या आकड्यांकडे सरकारला दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही.

बिगर आदीवासी भागात देखील 11 मतदारसंघात नोटाला 10हजाराच्या वरती मतदान आहे.

यात मुंबई नाॅर्थ वेस्ट आघाडीवर आहे. येथे नोटाला 18, 225 इतकी मते मिळाली आहेत. या खालोखाल मावळ 15779, जालणा 15637 , मुंबई साउथ 15115, मुंबई नाॅर्थ 11966, कल्याण 13012, इष्ट मुंबई 12466, यांसह 11 मतदारसंघात 10000 च्या वरती नोटा आहे.

बिगर आदीवासी भागातही

3,15,108 इतका नोटा वापरला आहे.

या आकडेवारीवरुन असे दिसुन येते की महाराष्ट्रातली इतकी मोठी लोकसंख्या कुठल्याच सरकारवर समाधानी नाही. त्यांनी सर्वांना नाकारलेले आहे.

Updated : 24 May 2019 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top