Home > मॅक्स रिपोर्ट > ईदच्या नमाजानंतर कश्मीरात हिंसाचार...

ईदच्या नमाजानंतर कश्मीरात हिंसाचार...

ईदच्या नमाजानंतर कश्मीरात हिंसाचार...
X

बकरी ईदनिमित्त हिंसाचार भडकू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कश्मीर खोऱ्यातील काही माथोफिरु तसेच फुटीरतावाद्यांनी हा हिंसाचार भडकविला. यावेळी श्रीनगर येथे इदगाह मैदानावर मीरवाईज उमर फारुखचे भाषण झाले व मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला. मीरवाईज हा हुरियतचा फुटीरतावादी नेता आहे. त्यांनी बकरी ईदच्या नमाजानंतर देशविरोधी नारे केले, पाकीस्तान व इसिसचे झेंडे फडकविले. या हिंसाचारात लष्करी जवान व पोलिसांवर दगडफेक झाली. तसेच दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन पोलीसदेखील शहीद झाले. या सर्व परीस्थीतीने कश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला असून सोपोर, बारामुल्ला, कुपवाडा येथेही हिंसाचार भडकला आहे.

Updated : 23 Aug 2018 11:37 AM GMT
Next Story
Share it
Top