Home > मॅक्स रिपोर्ट > #शेतकरी_वाचवा: तोंडाशी आलेला घास हिरावला

#शेतकरी_वाचवा: तोंडाशी आलेला घास हिरावला

#शेतकरी_वाचवा: तोंडाशी आलेला घास हिरावला
X

जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असल्याने सगळ्या पिकांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील वर्गीकृत पिकांचा हमीभाव शासनाने जाहीर केला. यात मूग, सोयाबीनचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागात मोठया प्रमाणात सोयाबीन, उडीद, मूग आणि भातपीकांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे. हाताला आलेलं पीक गेलं त्यामुळे शेतकरी दिवाळी सुद्धा साजरा करू शकला नाही. वाळु घातलेलं सोयाबीन सुद्धा पावसाने भिजला आहे. भिजलेले सोयाबीन वाळु घालण्यासाठी रस्त्यावर टाकावे पडत आहे आणि सोयाबीन वाळत असताना पाऊस येऊन सोयाबीन पुन्हा भिजत आहेत. हजारो एकर सोयाबीन, मूग, उडीद, भातशेती पिकाचे नुकसान झाले आहे. जगावं की मरावं असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. शेतीचं कर्ज कसं फेडावं हा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित झाला आहे.

कृषीउत्पन्न बाजार समिती मध्ये सुद्धा वाळु घातलेला सोयाबीन भिजल्यामुळे त्याला कोंब फुटू शकतो. असे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. भातशेती मोठया प्रमाणात या भागात घेतली जाते अती वृष्टीमुळे भातशेती जमीन ऊध्वस्त झाली आहे. जी थोडीफार भातशेती आहे त्यावर दोमा नावाचा रोग पडला आहे. या परिस्थितीचं गांभीर्य पाहून या तालुक्याचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी एकरी 50 हजार अनुदान देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे याबद्दल प्रधान सचिव यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असं ही त्यांनी म्हटलं.

Updated : 31 Oct 2019 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top