Home > मॅक्स रिपोर्ट > दूध उत्पादक सहकारी संघ बंद पडण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांसह कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

दूध उत्पादक सहकारी संघ बंद पडण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांसह कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

दूध उत्पादक सहकारी संघ बंद पडण्याच्या मार्गावर, शेतकऱ्यांसह कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
X

दूध धंदा हा शेतकऱ्यांना शेतीस हातभार लावणारा जोड धंदा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला कधी भाव मिळत नाही. तर कधी निसर्ग दगा देतो. त्यामुळं शाश्वत पैसे देणारं साधन म्हणून शेतकरी नेहमी दूध धंदा करताना पाहायला मिळतात.

मात्र, भंडारा जिल्हातील नावाजलेल्या भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ डबघाईस आल्यानं शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकले आहेत. या दूध संघाला दूध पुरवठा करणाऱ्या जवळपास 350 दूध उत्पादक संस्थेचे 18 कोटी रुपये थकले आहेत.

आता एवढी मोठी रक्कम भरण्यासाठी या संघाने त्यांच्याकडे असलेले मालमत्ता विक्री करुन त्या माध्यमातून या पुरवठादार संस्थेचे पैसे देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे येत्या काळात हा संघ पूर्णपणे बंद होऊ शकतो. अशी माहिती संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रात जवळपास चारशे कोटी च्या आसपास दुधाचा व्यवसाय होतो. यापैकी एकट्या भंडारा जिल्ह्यात शंभर कोटीच्या जवळपास दूधाचा व्यवसाय होतो. जिल्ह्यात असलेला भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ याला 2006 पासून सुगीचे दिवस आले होते. मात्र, मागच्या तीन वर्षानंतर हा संघ तोट्यात येणे सुरू झाला.

हे ही वाचा...

ऊस लागवड़ीची एक डोळा पद्धत शेतकऱ्यांच्या फ़ायद्याची की तोट्याची?

पुराने उद्ध्वस्त झालेल्या शाळा कधी दुरुस्त होणार?

कांदा महागला, अर्थमंत्री म्हणतात मी जास्त कांदा खात नाही

या संघाला जिल्ह्यातील 350 दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या माध्यमातून दुधाचा पुरवठा होतो. त्यामुळे या संघाशी अप्रत्यक्षपणे 35 हजार शेतकरी दुधाचा पुरवठा करतात. शेतकऱ्यांकडून दुधाचं संकलन करून दूध जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दूध उत्पादक सहकारी संस्थेची असते.

त्या पोटी या संस्थांना या संघातर्फे कमिशन दिले जाते. मात्र, त्या अगोदर या संस्थांना शेतकऱ्यांचे पैसे स्वतः घ्यावे लागतात. या दूध उत्पादक संस्थांनी शेतकऱ्यांकडून दूध एकत्रित करून संघाला दिले. मात्र, संघातर्फे मागच्या चार ते पाच महिन्यांपासून या संस्थांना पैसे दिले गेले नाही. त्यामुळे दोन लाखापासून तर पन्नास लाखापर्यंतचे या संस्थेचे चुकारे थांबलेले आहेत.

काही संस्थांनी कर्ज घेऊन दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे दिले. मात्र, दुधाचे पैसे परत न आल्याने कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आणि शेतकरी दोनही अडचणीत आले आहेत. असं शेतकरी शिवराम गिरीपुंजे यांनी मॅक्समहाराष्ट्र ला बोलताना सांगितलं.

या सर्व सहकारी संस्था चालकांनी शेतकऱ्यांच्या दुधाच्या पैशासाठी एकत्रित येत भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्या कार्यालयावर मोर्चा आणला. मात्र, अध्यक्ष नसताना कार्यकारी संचालक यांनी यावेळी शेतकऱ्यांची थकलेली रक्कम संस्थेची मालमत्ता विकून देण्याच्या विचारात असल्याचं कार्यकारी संचालकांनी सांगितले.

जुन्या व्यवस्थेनुसार यांनी दूध भुकटी प्रकल्पामध्ये मध्य प्रदेश, ओरिसा आणि छत्तीसगड इथून दूध आणून त्याच्यावर प्रक्रिया करून त्याद्वारे मिळणाऱ्या नफ्यावर दूध संघ चालविला पाहिजे होता.

संघाकडे आलेल्या दुधाचा पुरवठा हा मदर डेअरी, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अमुल यांना होत होता. मात्र, इथं पुरवठा केलेलं दूध हे भेसळयुक्त असल्याने दोनदा त्यांचा टॅकर परत पाठवण्यात आलं. आता अमूल आणि मदर डेअरी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचा दूध घेत नाही आणि या सर्व कारणांमुळे हा संघ आता डबघाईस आलेला आहे असा आरोप माजी अध्यक्ष विलास काटेकाये यांनी केला आहे.

मोठ मोठ्या कंपन्यांनी दूध घेणं बंद केल्यानं सर्वात मोठा तोटा शेतकऱ्यांनी आणि कामगारांना होणार आहे. दूध संघ बंद पडल्यानंतर कामगारांना घरी बसण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे यात शेवटी नुकसान हे शेतकरी आणि कामगारांचं होणार आहे. त्यातच पैसे न आल्यानं शेतकऱ्यांच्या दूध देणाऱ्या पशुधनावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

Updated : 5 Dec 2019 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top