Home > मॅक्स रिपोर्ट > वरंधा घाटातील वाहतुक चार महिन्यांपासुन ठप्प

वरंधा घाटातील वाहतुक चार महिन्यांपासुन ठप्प

वरंधा घाटातील वाहतुक चार महिन्यांपासुन ठप्प
X

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे गेल्या चार महिन्यांपासून वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. ऑगस्ट महीन्यातील अतिवृष्टीमुळे या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता आणि बऱ्याच ठिकाणी दरडही कोसळली होती. दोन महीन्यासाठी बंद केलेली वाहतुक जार महिने उलटुनही अद्याप सुरू झाली नाही. वाहतुक बंद असल्याने नागरिकांना प्रवासादरम्यान त्रास होत आहे.

हे ही वाचा...

राज्यातील 8 मिनी विधानसभांची कमान महिलांच्या हाती…

राज्यातील 5 जिल्हापरिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, 7 जानेवारीला मतदान

JNU protests : शैक्षणिक खर्च की भांडवली गुंतवणूक

नागरिकांना महाबळेश्वर मार्गाने पोलादपुर घाटातुन आता प्रवास करावा लागतोय. अंतर वाढल्यामुळे वेळ आणि पैसेसुद्धा दुप्पट खर्च होत आहेत. सोबतच स्थानिक नागरिकांच्या रोजगारावरही गदा आली आहे. प्रवासी वाहने कमी झाल्यामुळे घाटातील छोटे छोटे व्यवसाय सुद्धा आता ठप्प झाल्यामुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.

महाड हद्दीतील तुटलेल्या रस्त्यावर काम सुरू झाले मात्र, भोर हद्दीतील काम अजूनही सुरू नसल्याने नागरिकांकडून लवकरात लवकर मार्गाची दुरुस्ती करुन मार्ग सुरू करण्याची मागणी होते आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी काही दिवसात रस्त्याचे काम चालू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

Updated : 20 Nov 2019 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top