Top
Home > मॅक्स रिपोर्ट > #डिलीटनाहीहोत!

#डिलीटनाहीहोत!

#डिलीटनाहीहोत!
X

कोरोनाप्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात रिपोर्टींग करताना गेल्या साठ सत्तर दिवसात शेकडो दृष्ये कॅमेऱ्यात टिपली , ज्याच्या बात्म्या झाल्या . एक दृष्यं मात्र मला कॅमेऱ्यात टिपायचं धाडसच झालं नाही . पण ते माझ्या मनावर कोरलं गेलय. कितीही प्रयत्न केला तरी डिलीट नाही होत . सतत आठवत राहतं. समोर येउन उभं ठाकतं अचानक.

हायवेवरुन जाताना आम्हाला वाटेत चालत आपापल्या राज्याकडे निघालेले मजुर मिळायचे . गोव्यातून उत्तर प्रदेशला, गोव्यातून मध्यप्रदेशला , गोव्यातून बिहारला , गोव्यातून राजस्थानला असे अनेक राज्यात चालत जात असायचे . दिवसा , रात्री .. या मजुरांच्या मी बातम्याही केल्या .. पण त्यादिवशी.....

कणकवलीतून खारेपाटणला जात होतो . कोकणात येणाऱ्या मुंबईकरांच्या खारेपाटण चेकपोस्टवर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगांच्या बातमीसाठी . वाजले असतील अंदाजे संध्याकाळचे साडेचार वगैरे .. तळेरेच्या जवळपास आलो आणि चार पोरं चालत जाताना दिसली . मजूर होते सग्ळे. मी पुढे गेल्यावर त्यातला एक रडायला लागला . माझ्या मुलाच्या वयाचा होता . घळाघळा पाणी वाहू लागलं डोळ्यातून त्याच्या .. मी विचारलं क्या हुआ ? कहा जा रहे हो तुम लोग ? तुम रो क्यूं रहे हो . काहीच बोलला नाही . दुसऱ्याला विचारलं , तो ही काही नाही बोलला . शेवटी तिसऱ्याने सांगितलं , " एमपी जा रहे है साब, तीन दिन से चल रहे है गोवा से . इसको भूख लगी है इसिलिये रो रहा है. इसके पास पैसा भी नही है ...." मला माझा मजूर मुलगा माझ्यासमोर भुकेने व्याकूळ होउन रडतोय असंच वाटलं...

पुढे मी मग काय केलं त्या सर्वांसाठी हे सांगण्याची ही जागा नाही , आणि या पोस्टचा तो उद्देशही नाही . फक्त सांगायचं एव्हढंच आहे की तो मुलगा अजुनही भूक लागली म्हणून माझ्यासमोर व्याकूळ डोळे घेउन उभा आहे असा मला सतत भास होत राहतो ..तो त्याच्या गावी पोहोचला का हे मला माहीत नाही . पण इतर हजारो दृष्यात हे एकच दृष्यं मला सतत त्रास देतय जे कॅमेऱ्यात शूट नाही झालय ..

Updated : 21 Jun 2020 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top