Home > मॅक्स रिपोर्ट > माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो – उद्धव ठाकरे

माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो – उद्धव ठाकरे

माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो – उद्धव ठाकरे
X

‘माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, म्हणून शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष आहे. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. आज राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजप प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

‘’इतरांच्या पोरांचाही मी विचार करतो. दुसऱ्यांची पोरं धुणीभांडी करण्यासाठी वापरुन घेत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पवारांवर बोचरी टीका केली. सुजय विखे पाटील एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. तो खासदारकीसाठी एखाद्या जागेचा हट्ट करतो. त्याचा हा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची आहे. त्यांच्या वडिलांची आहे, असा टोला शरद पवार यांनी हाणला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या या टोल्याला खास ठाकरे शैलीत उत्तर दिले.

शरद पवार भविष्य कधीपासून कळाल?

आगामी निवडणुकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील असं मत शरद पवार यांनी व्यक्त केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांननी शरद पवार हे अष्टपैलू आहेत. नेते म्हणून ते चांगले आहेत, पण भविष्य कधीपासून सांगायला लागले माहित नाही. ज्योतिषी म्हणून त्यांची ओळख नवीन आहे. जसं आम्ही बोलतो, ते करुन दाखवतो, तसं ते बोलल्याच्या विरुद्ध करतात, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला.

Updated : 13 March 2019 11:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top