Home > मॅक्स कल्चर > लोककला जिवंत ठेवण्यासाठी दुरशेत गावावातील सुशिक्षीत तरूणांचा पुढाकार

लोककला जिवंत ठेवण्यासाठी दुरशेत गावावातील सुशिक्षीत तरूणांचा पुढाकार

लोककला जिवंत ठेवण्यासाठी दुरशेत गावावातील सुशिक्षीत तरूणांचा पुढाकार
X

बाल्या व माळी नाच हा कोकणातील ग्रामिण पारंपारीक नृत्यप्रकार विलुत्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपारीक नाचाची कला जिवंत ठेवण्यासाठी दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुणांनी पुढाकार घेतला अाहे. कोकणात मुख्यतः रायगड जिल्ह्यात गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी व होळी अशा विविध सणांमध्ये गावा खेड्यात पारंपारीक बाल्या डांस अाणि हि नाच मंडळी अनेक वर्षापासून अापली पारंपारीक काल सादर करत आहे. नाचण्याची विशिष्ठ व अाकर्षक ठेका व लय, कपड्यांचा वेगळेपणा अाणि काळजाला भिडणारी पारंपारीक, प्रबोधनात्मक गाणी व संगीत यामुळे अनेक वर्षांपासून बाल्या व माळी नृत्य खुप लोकप्रिय होते. मात्र अाधुनिकतेच्या युगात समाजामध्ये बाल्या नाच आणि माळी नाचाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे. तरुण पिढिने या कडे पाठ फिरविली आहे.त्यामुळे ही लोककला अाता लोप पावत चालली आहे. आपल्या पुर्वजांची हि कला टिकावी, तिचे जतन व्हावे यासाठी दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुण मागील दहा वर्षापासून स्वतः हि कला सादर करुन जोपासत अाहेत. यातील अनेक तरुण पदविधर अाहेत तर कोणी इंजिनियर देखिल अाहेत. मात्र प्रत्येकजण तनमनधनाने कोणताही संकोच न बाळगता हि कला सादर करतात व त्यासाठी मेहनत घेत अाहेत. सुधागड, पेण, रोहा तालुक्यातील इतर गावांमध्ये सुद्धा या तरुणांना ही कला सादर करण्यासाठी बोलावले जाते. ही कला जतन करण्यासाठी गावातील लोकांचा खुप मोठा सहभाग आहे. प्रत्येक कार्यक्रमावेळी दुरशेत गावातील ग्रामस्त तरुणांसोबत असतात. विशेष म्हणजे आपली पारंपारीक कला आपली मूल आपली नातवंड पुढे नेतात याचा गावातील वृद्धांना खूप अानंद व समाधान वाटते.

Updated : 11 Nov 2018 10:59 AM GMT
Next Story
Share it
Top