Home > मॅक्स रिपोर्ट > अशी होणार दहशतवाद विरोधी जनजागृती

अशी होणार दहशतवाद विरोधी जनजागृती

अशी होणार दहशतवाद विरोधी जनजागृती
X

गेल्या काही काळात राज्यात दहशतवाद वेग धरत असल्यामुळे राज्य दहशतवाद विरोधी पथक स्थापन करण्यात आलं. त्यानंतर राज्यातल्या दहशतवादाला चाप बसण्यासाठी हे पथक अत्यंक हुशारकीने आणि सतर्कतेनं कामगिरी करत आहे. त्यांच्या या कामगिरीला कुठेतरी यश मिळू लागलं आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने दहशतवाद विरोधी बोधचित्रफितीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाद्वारे निर्मित दहशतवादी कारवायांविरोधातील बोधचित्रफित जनजागृतीसाठी उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाद्वारे निर्मित बोधचित्रफितीचा लोकार्पण कार्यक्रम वर्षा निवासस्थानी झाला. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे, पोलीस गृहनिर्माणचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन बिहारी आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन चित्रफित तयार करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाचे कौतुक केले. मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांमध्ये जाणीव जागृतीसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. या चित्रफित डीजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. हिंदीसोबत मराठी भाषेतही या चित्रफिती तयार करून इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाला दोन वर्षात चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण आपण करू शकलो, लोकांच्या भावना भडकावणाऱ्यांवर व दहशतवादी कारवायांवर आगामी काळात लक्ष द्यावे लागेल. यासाठी पथकाला अधिक सतर्क राहावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बोधचित्रफितीचा कसा होणार फायदा?

या बोधचित्रफितीमध्ये दहशतवादापासून दूर कसे राहावे, आपल्या मुलांना त्यापासून दूर कसे ठेवावे, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी युवकांना त्यापासून रोखण्यासाठी 'सुपर हिरोज' कसे काम करतात, याबाबतची माहिती दिली आहे. दहशतवादी कारवाया होऊ नयेत, यासाठी आपली सतर्कता, सहयोग, सक्रियता महत्त्वाची तसेच राष्ट्रीय एकात्मता महत्त्वाची असल्याचे संदेशही दिले आहेत. यावेळी 8 बोधचित्रफितींचे सादरीकरण करण्यात आले.

Updated : 27 Jan 2019 4:39 AM GMT
Next Story
Share it
Top