Home > Election 2020 > …तर प्रकाश आंबेडकर जिंकले असते

…तर प्रकाश आंबेडकर जिंकले असते

…तर प्रकाश आंबेडकर जिंकले असते
X

अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला आहे. प्रकाश आंबेडकर यांना या ठिकाणी 2 लाख 78 हजार 848 मतं मिळाली आहेत. तर विजयी उमेदवार भाजपचे संजय धोत्रे यांना 5 लाख 54 हजार 444 मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांना 2 लाख 54 हजार 370 मतं मिळाली आहेत.

प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत या ठिकाणी आघाडी केली असती तर… अकोल्याचे चित्र निश्चितच वेगळे राहिले असते. कारण कॉंग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांना मिळालेली २ लाख 54 हजार 370 मतं आणि प्रकाश आंबेडकरांना मिळालेली 2 लाख 78 हजार 848 मतं या मतांची बेरीज केली असता, अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा विजय निश्चित झाला असता हे आकडेवारी स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी न केल्याचा फटका कॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबरच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील बसल्याचं या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या ठिकाणी भाजपचे संजय धोत्रे 2 लाख 75 हजार 596 मतांनी विजयी झाले आहेत.

भाजप - संजय धोत्रे -554444

कॉंग्रेस - हिदायत पटेल 254370

वंचित आघाडी - अँड प्रकाश आंबेडकर 278848

विजयी उमेदवार - भाजप - संजय धोत्रे -275596

Updated : 25 May 2019 7:02 AM GMT
Next Story
Share it
Top