नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये अर्थमंत्रीपद भूषविलेल्या अरूण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा दुसऱ्यांदा मंत्रिपद नाकारत शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली. स्वराज आणि जेटली हे मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात हायप्रोफाईल मंत्री होते. मात्र, मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये काम करायला जेटली हे फारसे उत्सुक नव्हते. २९ मे रोजी म्हणजेच शपथविधीच्या एक दिवस आधीच प्रकृतीचं कारण सांगत मंत्रिमंडळात काम करण्यास इच्छुक नसल्याचं कळवलं होतं. तर सुषमा स्वराज यांनीही प्रकृतीचंच कारण पुढे करत मंत्रिमंडळात काम करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळं आता या दोन्ही महत्त्वाच्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, हे काही वेळातच स्पष्ट होईल.
Updated : 30 May 2019 4:21 PM GMT
Next Story