Home > मॅक्स रिपोर्ट > ४ सप्टेंबरला मराठा समाजाचा मोर्चा मंत्र्यालयावर धडकणार

४ सप्टेंबरला मराठा समाजाचा मोर्चा मंत्र्यालयावर धडकणार

४ सप्टेंबरला मराठा समाजाचा मोर्चा मंत्र्यालयावर धडकणार
X

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता मंत्र्यालयाला धडक देणार असून ४ सप्टेंबर रोजी कोल्हापुरातून सकाळी मुंबईला मराठा समाजाचे कार्यकर्ते गाडीमार्चने रवाना होणार असल्याची माहिती इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही असा असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने या पत्रकार परिषदेत दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीस अन्य मागण्यासाठी आज मुस्कान लॉन इथं समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत १९ ठराव मांडण्यात आले. ३१ ऑगस्टच्या आत मराठा व आरक्षणाची मागणी मान्य करावी अन्यथा ४ सप्टेंबरला दांडीमार्चने मुंबईत धडक देणार असून त्याचे परिणाम सरकारने भोगावेत असा इशारा इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी अधिक माहिती देताना इंद्रजित सावंत यांनी मुंबईतील आंदोलन हे शांततेने करणार असून आम्ही मंत्र्यालयासमोर ठिय्या मांडणार आहोत. आता आरपारची लढाई लढण्यास आम्ही सज्ज झालोय. पालकमंत्री सांगतात आरक्षण न्यायालयात आहे. आता भूमिका बदलून राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावर आरक्षण देऊ असं सांगतात. मुख्यमंत्री आरक्षण कसे देणार हे सांगत नाहीत. आम्हाला ओबीसी कोट्यातून अरक्षण पाहिजे. राज्य मागासवर्गीय आयोग सरकारच्या दबावाने अहवाल देण्यास विलंब लावत आहे.

ठराव सागराला अर्पण करणार

या मागण्यांसाठी गाडी मार्चमध्ये पहिल्या गाड्या लोकप्रतिनिधींच्या गाड्या लागल्या पाहिजेत. श्रीमंत शाहू महाराजांची पहिली गाडी असेल. ४ सप्टेंबर रोजी सकाळी दसरा चौकातून मुंबईला रवाना होणार असल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितलं. तर यावेळी यावेळी दिलीप देसाई यांनी यापूर्वी झालेल्या ठरावांवर सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. सरकारला लाजविण्यासाठी इंडिया गेट समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्ष ठेऊन हे सगळे ठराव सागराला अर्पण करणार. आंदोलन फोडण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. सरकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही असं देसाई यांनी सांगितलं.

हर्षल सुर्वे यांनी कोल्हापुरातून सध्या एक हजार गाड्या तयार आहेत. मुंबईतील आंदोलनासाठी जिल्ह्यातून सुमारे पाच हजार गाड्या सहभागी होतील अस हर्षल सुर्वे यांनी सांगितले. यावेळी वसंतराव मुळीक यांनी या आंदोलनात राज्यभरातील मराठा समाज सहभागी होणार असल्याचे सांगितले. तर प्रवीण पाटील यांनी सांगली जिल्ह्यातून जास्तीत जास्त मराठा बांधव सहभागी होतील अस सांगितलं. यावेळी संजय जाधव यांनी मुंबईच्या आंदोलनासाठी आपले पाच ट्रक देणार असल्याचे सांगितले. मुंबईतील आंदोलनासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सकल मराठा बांधवांनी सहभागी व्हावे असे अवाहन समन्वय समितीने या पत्रकार बैठकीत केले.

या पत्रकार बैठकीस चंद्रकांत पाटील, प्रज्ञा जाधव, प्रवीण पाटील, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, प्रा नानासाहेब घाटे, ऍड धनराज राणे, ऍड दीपक भोसले, नितीन तोरस्कर, प्रमोद पाटील यांच्यासह राज्यभरात पश्चिम महाराष्ट्र सकल मराठा समन्वय समितीचे समन्वयक उपस्थित होते.

Updated : 22 Aug 2018 5:36 PM GMT
Next Story
Share it
Top