Home > मॅक्स किसान > नेते शपथविधी सोहळ्यात व्यस्त, दुसरीकडे बीडमध्ये शेतकरी कुटुंब उध्वस्त

नेते शपथविधी सोहळ्यात व्यस्त, दुसरीकडे बीडमध्ये शेतकरी कुटुंब उध्वस्त

नेते शपथविधी सोहळ्यात व्यस्त, दुसरीकडे बीडमध्ये शेतकरी कुटुंब उध्वस्त
X

नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील इतरही सदस्य शपथ घेत आहेत. त्यासाठी देशभरातून सुमारे ७ हजार पाहुणे दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात दाखल झालेले आहेत. बहुतांश पक्षांचे नेते हे दिल्लीत या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यात व्यस्त असतांनाच बीडमध्ये एका ५० वर्षीय शेतकऱ्यानं नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्यानं त्या शेतकऱ्याचं कुटुंबच उध्वस्त झाल्याची दुर्देवी घटना घडलीय.

बीडच्या अंजनवती येथी बबन श्रीपती शिंदे असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बबन श्रीपती शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 10 लाख रुपये कर्ज होते. दुष्काळामुळं शेतीतही उत्पन्न निघत नव्हतं, अशा परिस्थितीत हे कर्ज फेडायचे कसे ? असा बबन शिंदे यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नैराश्येतून बबन शिंदे यांनी गुरुवारी रोळगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलीय. बबन शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व 4 विवाहित मुली असा मोठा परिवार आहे. शिंदे यांच्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Updated : 30 May 2019 1:15 PM GMT
Next Story
Share it
Top