Home > News Update > देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र सर्वांधिक पुढे ! 2018 मध्ये नोंदवले गेले सर्वाधिक गुन्हे...

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र सर्वांधिक पुढे ! 2018 मध्ये नोंदवले गेले सर्वाधिक गुन्हे...

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र सर्वांधिक पुढे ! 2018 मध्ये नोंदवले गेले सर्वाधिक गुन्हे...
X

नॅशनल क्राइम रेकॉर्ड 2018 (NCRB 2018 Report) ची आकडेवारी अखेर जाहीर झाली आहे. या अहवालानुसार 2018 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) 2018 मध्ये फडणवीस सरकार असताना 3,46,291 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर भाजप शासीत उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) 3,42,355 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

2017 चा विचार करता NCRB च्या आकडेवारीनुसार भाजपशासीत उत्तर प्रदेश मध्ये 3,10,084 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही आकडेवारी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ पेक्षा जास्त होती. 2016 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये 2,82,171 गुन्हाची नोंद करण्यात आली होती. या आकडेवारी नुसार 2016 ला उत्तर प्रदेश एक नंबर वर होता.

हे ही वाचा

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अखेर मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुलीच्या छेडछाडीचा आरोप असलेले DIG मोरे निलंबित…

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अजित पवारांची नवीन योजना

2018 च्या अहवालानुसार देशात झालेल्या हत्यांचा विचार केला तर भाजपशासीत उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश मध्ये 4018 त्यानंतर दूसऱ्या क्रमांकांवर भाजप आणि जेडीएस शासीत बिहारचा असून बिहारमध्ये 2934 हत्या झाल्या आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 2199 हत्या झाल्या.

महिला बलात्कारांच्या गुन्ह्याचा विचार केला तर कॉंग्रेस शासीत मध्यप्रदेशमध्ये 2018 ला सर्वांधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

मध्यप्रदेश 5433

राजस्थान 4335

तर उत्तर प्रदेश मध्ये 3946 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

या अहवालानुसार दंगलीचे सर्वाधिक गुन्हे बिहार मध्ये नोंदवण्यात आले आहेत. ही संख्या 10,276 आहे. तर दंगलीच्या गुन्हामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 2018 ला 9473 गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचा दंगलीच्या गुन्ह्यामध्ये तिसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशमध्ये 8908 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

2018 मध्ये सांप्रदायिक दंगलीच्या गुन्ह्याचा विचार केला तर बिहार मध्ये 167, हरियाणा मध्ये 45, मध्यप्रदेश मध्य़े 42 आणि गुजरात मध्ये 39 सांप्रदायिक दंगली झाल्या.

मोठ्य़ा शहरातील अपराधांचा विचार केला तर केंद्रशासीत (मोदी सरकारच्या अखत्यारीत) प्रदेश असलेल्या दिल्ली मध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अहवालानुसार 2,25,977 गुन्हे दिल्लीत नोंदवण्यात आले आहेत.

भाजपशासीत राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील गाजीयाबादमध्ये 11,765, कानपुर मध्ये 7,747, लखनऊ मध्ये 1,71,85 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे नितीश कुमार आणि भाजप चं सरकार असलेल्या बिहारची राजधानी पटना मध्ये 1,17,42 गुन्हे दाखल झाले आहेत. तर कॉंग्रेसशासीत राजस्थानची राजधानी जयपुर मध्ये 22,754 गुन्हांची नोंद झाली आहे. .

Updated : 10 Jan 2020 9:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top