Home > मॅक्स रिपोर्ट >   मी वर जाऊन दादाला सांगणार लाईट आली - जानू उंबरसाडे

  मी वर जाऊन दादाला सांगणार लाईट आली - जानू उंबरसाडे

  मी वर जाऊन दादाला सांगणार लाईट आली - जानू उंबरसाडे
X

मुंबईच्या एखाद्या भागात लाईट पोहोचलीच नाही. असं म्हटलं तर तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. मात्र, हे खरं आहे. मुंबईतील आरे कॉलनीतील आदिवासी पाड्यातील आदिवासींनी वर्षानुवर्ष संघर्ष करुन वीज मिळवली. विशेष म्हणजे सरकारच्या एखाद्या योजनेअंतर्गत ही वीज देण्यात आली नसून त्यांनी त्यांचा हक्क संघर्षाने मिळवला आहे.

आरे कॉलनीतील २७ पाड्यांपैकी एक नवश्याचा पाडा म्हणून एक 65 ते 70 घरांचा आदिवासी पाडा आहे. या पाड्यापासून साधारण अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर उंच उंच टॉवर आहेत. या टॉवरमध्ये सर्व सुविधा आहेत. मात्र, या पाड्यात स्वातंत्र्यापुर्वीही जो अंधार होता. तो आजही कायम आहे.

वीजेची परवानगी दिल्यानं आदिवासी बांधवानं साजरा केला आनंदोत्सव

खरं तर आरे कॉलनीच्या जागेवर उभं राहिलेल्या पशु वैद्यकीय महाविद्यालयात ४० वर्षा पुर्वीच वीज पोहोचली. मात्र, या पाड्यात अजूनही वीज पोहोचली नाही. त्यामुळे वीज आणि पाणी नसल्याने या आदिवासींची मोठी गैरसोय होत आहे. जर आपल्या घरच्या शेजारी वीज आणि पाणी पोहोचू शकते, तर आपल्याला ही सुविधा का मिळू शकत नाही. असा प्रश्न त्यांच्या पिढ्यानं पिढ्या समोर येत राहिला. आज त्यांनी संघर्ष करुन परवानगी मिळवली आहे. मात्र, खऱ्या अर्थाने या सुविधा कधी मिळणार? हा प्रश्न मात्र, अनुत्तरीतच राहतो.

या संदर्भात आम्ही वर्षानुवर्ष आदिवासींच्या हक्कासाठी लढ्यात सामील झालेल्या जानू दिवा उंबरसाडे यांच्याशी बातचित केली. जानू ने वीज मिळण्यासाठी परवानगी दिल्यामुळे आनंद व्यक्त करत…

दादा गेले; आजोबा गेले; आता मी म्हातारा झालो तेव्हा कुठे NOC आली असल्याचं सांगत वर गेल्यानंतर दादाला सांगेल लाईट आली म्हणून असं म्हणत वर्षानुवर्ष केलेल्या संर्घषाच्या आठवणी जागवतात.

"आजचा दिवस आमच्यासाठी आणि त्याहीपेक्षा आमच्या मुलांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे. आमच्या पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला. आता मी वर जाऊन दादाला सांगणार लाईट आली’’ असं जानू दिवा उंबरसाडे यांनी मॅक्समहाराष्ट्रला सांगत आनंद व्यक्त केला.''

आदिवासींच्या हक्कासाठी गोरेगाव मध्ये केलेल्या आंदोलनात आदिवासी लोकांना पोलिसांनी पकडून नेल्याची आठवण जानू आवर्जून सांगतात. पुर्वीची आदिवासी आंदोलनं आणि आत्ताची आंदोलनं आता फरक आहे.. पुर्वीच्या आंदोलनामध्ये मार खावा लागायचा आत्ताच्या आंदोलनात पोलिस मारत नाही. पुर्वी आंदोलन केली तर पोलिस लाठीचार्ज करायचे. आम्ही आमच्या हक्कासाठी दिल्ली ला गेलो. हे जानू सांगायला विसरत नाही.

वीज आणि पाण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्षात वीज आणि पाणी अशा सुविधा कधी मिळणार या संदर्भात प्रश्न विचारला असता जानू चिंता व्यक्त करतात. त्यांना सरकार दुसरीकडे घर बांधून देणार असल्याचं सांगितल्यावर जानू निराश होतात. शेतीबाडी नाही भेटली तर घर कसं चालणार? वय झाला की कामं ही भेटत नाही. त्या भेटलेल्या घराचा मेटेन्स कुठून भरणार? असा सवाल जानू करतात…

जानूला आता काम होत नाही म्हणून ते कुठेही बाहेर जात नाही. मात्र, जानूला आता चिंता आहे. त्यांच्या पुढच्या पिढीची...

Updated : 9 Jun 2019 11:39 AM GMT
Next Story
Share it
Top