News Update
Home > Election 2020 > आगामी विधानसभा निवडणूकांचा कल आताच स्पष्ट

आगामी विधानसभा निवडणूकांचा कल आताच स्पष्ट

आगामी विधानसभा निवडणूकांचा कल आताच स्पष्ट
X

देशभरातील मतदारांनी देशाची सत्ता सलग दुसऱ्यांदा बहुमताच्या जोरावर भाजपला स्पष्ट कल दिला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचा कल आताच बऱ्यापैकी स्पष्ट झाला आहे.

महाराष्ट्रासह ज्या राज्यातील प्रादेशिक पक्षांनी मोदींना थेट विरोध केला, त्या पक्षांना स्वतःच्या राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसतोय. आंध्रप्रदेशमध्ये तेलगु देसम पार्टीसारख्या सत्ताधारी पक्षाला लोकसभेसह विधानसभेतही जनमतानं नाकारल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीनंही महाराष्ट्रात मोदींना विरोध केला, त्याचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वाधिक होतोय. अशा परिस्थितीत आता पॉवरफूल असलेल्या भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूकांमध्ये संबंधित राज्यातील मित्रपक्षांना जागावाटपामध्ये फार वरचढ होऊ देणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातच नाही तर सर्वाधिक जागा जिंकत भाजप हा एनडीएमध्ये मोठा भाऊ झालेला आहे, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाणं आणि ते देतील तेवढ्या जागांवर निवडणुका लढवणं हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय भाजपच्या मित्रपक्षांसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळं भाजपच्या विजयाचा रथ हा आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही दिसणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीय. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजपसोबत थेट पंगा घेणं एनडीएतील मित्रपक्षांना परवडणार दिसत नाहीये.

Updated : 24 May 2019 7:04 AM GMT
Next Story
Share it
Top