Home > मॅक्स रिपोर्ट > हायकोर्टाने भीमा- कोरेगावच्या याचिकाकर्त्यांना सुनावले

हायकोर्टाने भीमा- कोरेगावच्या याचिकाकर्त्यांना सुनावले

हायकोर्टाने भीमा- कोरेगावच्या याचिकाकर्त्यांना सुनावले
X

आज मुंबई उच्च न्यायालयात भीमा-कोरेगाव प्रकरणाची सीआयडीतर्फे तपासणी करण्यात यावी यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल मलिक चौधरी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचसंदर्भात सुनावणी घेताना न्यायालयाला याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी संबंधितांची तक्रार करण्याआधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिली असल्याची बाब निदर्शनास आली. व त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले. छोट्या - छोट्या गोष्टींवरुन थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करणाऱ्या लोकांना न्यायालयाने चांगलीच सुनावले.

एखाद्या तक्रारीच्या निवारणासाठी पोलीस अथवा न्यायसंस्थेकडे दाद न मागता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार कसला करता? काही लोक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रारी करतात. त्यासाठी त्यांना पत्रं लिहितात. लोकांना त्याची सवयच झाली आहे, असे हायकोर्टाने भीमा- कोरेगावच्या याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. व तक्रारीच्या निवारणासाठी पोलीस आणि न्यायालयात दाद मागण्याऐवजी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना थेट पत्रं लिहिणे चुकीचे असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.

Updated : 8 Sep 2018 11:12 AM GMT
Next Story
Share it
Top