Home > मॅक्स रिपोर्ट > जातपडताळणी समितीच्या उपायुक्तांना चौकशी करुन निलंबित करा - अजित पवार

जातपडताळणी समितीच्या उपायुक्तांना चौकशी करुन निलंबित करा - अजित पवार

जातपडताळणी समितीच्या उपायुक्तांना चौकशी करुन निलंबित करा - अजित पवार
X

अनुसूचित जमाती जात पडताळणीचे उपायुक्त बी.पी.जगताप यांना निलंबित करण्याचे अध्यक्षांचे निर्देश...

नागपूर दि.२० जुलै - विविध शासकीय पदावर काम करत असताना अनुसूचित जमाती जात पडताळणीचे उपायुक्त बी.पी.जगताप यांनी सुप्रीम कोर्टाने रद्द केलेल्या उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र दिले शिवाय आंध्र, कर्नाटक राज्यातील अनेक लोकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र दिले असल्याने या प्रकरणाची चौकशी करुन त्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात केली.

शिवाय अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे उपायुक्त बी.पी जगताप यांनी जाणीवपूर्वक वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यास टाळाटाळ केली आहे.याबाबतची माहितीही अजितदादांनी सभागृहात दिली.

बरलावर या इसमाने सख्खे भाऊ, चुलत भाऊ, काका, आतेभाऊ, मामेभाऊ व इतर नातेवाईक यांचे वैधता प्रमाणपत्र जोडले आणि त्याच आधारावर बरलावार यांनी जातवैधता प्रमाणपत्राची मागणी उपायुक्तांकडे केली होती परंतु सगळी कागदपत्रे देवूनही जगताप यांनी जाणीवपूर्वक जातप्रमाणपत्र देण्यास विलंब केला असेही दादांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

आंध्र, कर्नाटकमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे जातप्रमाणपत्र देवून संबंधित अधिकाऱ्याने यातून ५०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती जमवली आहे असा आरोपही अजितदादांनी केला.

अजितदादा पवार यांनी मांडलेल्या गंभीर लक्षवेधीच्या प्रश्नांनतर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्या उपायुक्ताला निलंबित करण्याचे निर्देश दिले.

Updated : 20 July 2018 11:52 AM GMT
Next Story
Share it
Top