Home > मॅक्स रिपोर्ट > Social Media : कुणाला मिळायला हवा होता ‘भारतरत्न’ आणि कुणाला नको? काय म्हटलंय नेटिझन्सनी...

Social Media : कुणाला मिळायला हवा होता ‘भारतरत्न’ आणि कुणाला नको? काय म्हटलंय नेटिझन्सनी...

Social Media : कुणाला मिळायला हवा होता ‘भारतरत्न’ आणि कुणाला नको? काय म्हटलंय नेटिझन्सनी...
X

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, समाजसेवक आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे.

दरम्यान प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधान आले आहे. अनेकांनी नानाजी देशमुख यांना पुरस्कार मिळाला म्हणून टीका केली आहे. तर अनेकांनी सावरकरांना पुरस्कार मिळाला नाही म्हणून मोदी सरकारवर आपल्या टिकेचे बाण सोडले आहेत पाहूया कोण काय म्हणाले ते

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सावरकरांना पुरस्कार मिळाला नाही म्हणून सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी दोन ट्विट केले असून पहिल्या ट्विटमध्ये ''भारतरत्न नककी कुणाला? आज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी. शेम शेम'' असं म्हणत सरकारचा निषेध केला आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये सावरकरांच्या 'सागरा प्राण तळमळला' या कवितेचा दाखला देत 'विनायका प्राण तळमळला' असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लेखक आणि पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी भारतीय जन संघाचे ज्येष्ठ नेते राहिलेल्या नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या लेखनीतून

'संघ दक्ष

म्हणणाराच असेल

यापुढे

भारतरत्न’ असं म्हणत संघाच्या नानाजी देशमुख यांना भारतरत्न मिळाल्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे लेखक संविधानतज्ञ अॅड असिम सरोदे यांनी

'गाड्यासोबत नळ्याची यात्रा

यात्रेकरी नानाजी देशमुख'

असं म्हणत नानाजी देशमुखांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव करणारे 'मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ हे पुस्तक लिहिणारे आशिष चांदोरकर यांनी देखील खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणेच 'स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त तोंडी लावायला का'....? या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे.

'नानाजी देशमुखांना भारतरत्न आणि अशोकराव कुकडे यांना पद्मभूषण हे स्वागतार्हच आहे. पण मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काय... की ते फक्त तोंडी लावायला.' असा सवाल आशिष चांदोरकर यांनी उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न न दिल्याने सरकारचा निषेध केला जात आहे. पत्रकार हळनवर शिवाजी यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहून सरकारचा निषेध केला आहे.

'ज्योतीबा-सावित्रीमाय साठी "भारत रत्न" कसा असेल?

तो तर राखीव असणार ना ..

संघ कार्यक्रमात हजेरी लावणार्या प्रणवदा साठी.!'

असं म्हणत संघाच्या आमंत्रणावरुन संघ मुख्यालयात भाषण केल्यामुळेच प्रणव मुखर्जी यांना भाजप सरकारने पुरस्कार दिला आहे असा आक्षेप हळनकर शिवाजी यांनी घेतला आहे.

तर पहिल्या पोस्टमध्ये नानाजी देशमुख यांना पुरस्कार दिला म्हणून निषेध व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत वानखेडे यांनी देखील याच आशयाची पोस्ट केली आहे. ज्योतीबा-सावित्रीमाय साठी "भारत रत्न" कसा असेल?

तो तर राखीव असणार ना संघ कार्यक्रमात हजेरी लावणा-या प्रणव मुखर्जींसाठी. असं म्हणत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान प्रणव मुखर्जी हे संघाच्या कार्य़क्रमाला गेले म्हणून त्यांना भाजप सरकारने पुरस्कार दिला असा आक्षेप सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे नानाजी देशमुख हे संघाचे नेते असल्यामुळे त्यांना भारतरत्नने गौरविण्यात आल्याचा आक्षेप नेटिझन्सनी घेतला आहे. तर खासदार संजय राऊतसह भाजपशी निकट असलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींनी सावरकरांना भारतरत्न न मिळाल्यानं आपला निषेध नव्यक्त केला आहे.

Updated : 25 Jan 2019 7:39 PM GMT
Next Story
Share it
Top