Home > मॅक्स रिपोर्ट > जेव्हा महिला खासदार फुगडीचा आनंद घेतात....

जेव्हा महिला खासदार फुगडीचा आनंद घेतात....

जेव्हा महिला खासदार फुगडीचा आनंद घेतात....
X

केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत आपल्या कार्यकाळात शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विविध पक्षातील महिला खासदारांनी एकत्र जेवण केल्यानंतर काहीसा विरंगुळा म्हणून पारंपारिक फुगडी खेळाचा आनंद लुटला आहे. कामाच्या बिझी शेडूयलमधून महिला खासदारांनी पहिल्यादांच असा एकत्रित वेळ घालवल्याचा व्हिडिओ पाहायला मिळतोय. महिला खासदार एकत्र फुगडी करतानाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/i/status/1091328517575454724

केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये हरसिमरत कौर बादल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, भाजपा खासदार किरण खेर, द्रमुक खासदार कनीमोळी, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल दिसत आहे. तर स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर बादल यांनी फुगडीचा फेर धरला आहे.

Updated : 3 Feb 2019 8:40 AM GMT
Next Story
Share it
Top