Home > मॅक्स रिपोर्ट > 'अयोध्येचा राम' सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात...

'अयोध्येचा राम' सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात...

अयोध्येचा राम सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात...
X

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा सुरु आहे. या दौऱ्याला उद्धव ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले असून आजच (25 नोव्हेंबरला) विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसद असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी अयोध्येला वेढा घातला आहे. या वेढ्यामुळे अयोध्येला छावणीचे स्वरुप आले आहे.

अयोध्येत डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात जे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमिवर आज अयोध्येत सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अयोध्येतील या वातावरणामुळे स्थानिक लोकांमध्ये भितीचे वातावरण असून लोकांनी आत्ताच घरामध्ये अन्नधान्य भरण्यास सुरवात केली आहे. अयोध्येतील जर आपण सध्याचे वातावरण पाहिले तर अयोध्येच्या भगवान श्रीरामाला सुरुक्षा रक्षकांचा वेढा पडला असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता माणसांबरोबरच देवाला देखील धोका निर्माण झाला आहे का? असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

  • एक अतिरिक्त पोलीस महासंचालक स्तराचे अधिकारी
  • एक उप-पोलीस महानिरीक्षक
  • तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक
  • 10 अपर पोलीस अधीक्षक
  • 21 क्षेत्राधिकारी 160 पोलीस अधिकारी

पीएसीच्या 42 आणि आरएएफच्या 5 कंपन्या, एटीएसचे कंमाडो आत्तापर्यंत तैनात करण्यात आल्या असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated : 24 Nov 2018 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top