वेश्या व्यवसाय: नियम शिथिल होऊनही ग्राहक फिरकेना…

sex
Courtesy: Social Media

पुणे शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अत्यंत दाटीवाटीचा समजल्या जाणाऱ्या रेड लाईट एरियात म्हणजे बुधवार पेठेत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. हे कसं शक्य झालं आणि या कामात वेश्या वस्तीत काम करणाऱ्या सहेली संस्था कशी मदत करतात.

समाजाची शारिरीक गरज आणि भूक भागवणारी वस्ती म्हणून पुण्यात बुधवार पेठेची ओळख आहे. मात्र, कोरोनाच्या संकटात ही पेठ बंद करावी लागली. बुधवारी पेठेतील वेश्या व्यवसाय Sex Work बंद झाला. कारण वेश्या Sex Worker ज्या भागात राहतात. त्या भागातील घरं अतिशय दाटीवाटीची आहे. एका एका घरात चार चार महिला (Sex Worker) राहतात. या ठिकाणी फिजीकल डिस्टंसिंग (Physical Distancing issue in Sex Worker Area) पाळणंही अवघड होतं.

त्यामूळे पालिका प्रशासनानं ही पेठ सील (Pune Sex Worker Area) करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यशही आलं. या कामात सहेली संस्थेची बरीच मदत प्रशासनाला झाली. गल्ल्यांमध्ये जाऊन महिलांमध्ये जाणीव जागृती करण्याचं काम या संस्थेने केले. परिणामी महिलांनाही व्यवसाय करण्यास नकार दिला आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला. तो म्हणजे बूधवार पेठेत कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.

बूधवार पेठेत (Pune BudhWar Peth Sex Worker Area) एकूण 12 गल्ल्या आहेत. या 12 गल्यांमध्ये साधारण 2000 महिला वेश्या व्यवसाय करातात. मात्र या दोन हजार महिलांच प्रबोधन करून त्यांच्यापर्यंत माहिती आणि मदत पोहोचवण्याचं काम सहेली संस्थेनं केलं.

आता या बुधवार पेठेतील नियम हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. (Pune SexWorker Start SexWork After Lockdown) कारण अनलॉक 1 च्या काळात अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली. मात्र, अजुनही इकडे ग्राहक फिरकलेला नाही.

वेश्या व्यवसाय करणार महिलांनी काळजी संबंध ठेवताना कशी काळजी घ्यावी? याची माहिती सहेली संस्थेतल्या कर्मचाऱ्यांकडून महिलांना दिली गेली आहे. एक ध्वनिफीत बनवून ग्राहकांशी शारीरीक संबंध ठेवण्याआधी कोणती काळजी घ्यावी याची माहिती प्रसारीत केली जात आहे. महिलांकडूनही स्वतःची काळजी म्हणून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सँनिटायझर दिलं जातंय. आणि मास्कही लावण्यास सांगितला जातोय.

सध्या बाजारपेठेत एकही रुग्ण नाही. ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र, सध्या इथल्या महिलांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलीये. रोजचं गिऱ्हाईक करावं तेव्हा कुठे पोटाची गाडी चालणार आहे. तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यानं यांचं पोट देखील लॉक झालं आहे. समाजाची शारिरीक भूक भागवताना या महिलांनी स्वत:च्या पोटाचा विचार न करता कोरोनापासून देशाला वाचवण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here