Home > मॅक्स रिपोर्ट > योगी सरकारला टेन्शन! मित्रपक्ष एसबीएसपी ची महाराष्ट्रात रॅली आरक्षण नाही मिळालं तर सत्तेतून बाहेर पडणार

योगी सरकारला टेन्शन! मित्रपक्ष एसबीएसपी ची महाराष्ट्रात रॅली आरक्षण नाही मिळालं तर सत्तेतून बाहेर पडणार

योगी सरकारला टेन्शन! मित्रपक्ष एसबीएसपी ची महाराष्ट्रात रॅली आरक्षण नाही मिळालं तर सत्तेतून बाहेर पडणार
X

युपी च्या योगी सरकारमध्ये सामील एसबीएसपी मित्रपक्षाने योगी सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. पक्षाचे अध्यक्ष आणि सरकारमध्ये वरिष्ठ कॅबिनेट मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी मागास समाजाची एक रॅली पनवेल मध्ये आयोजित करून महाराष्ट्रातून योगी सरकारच्या विरोधात रसद गोळा करायला सुरूवात केली आहे.

उत्तरप्रदेशच्या भाजपा सरकारमध्ये सामील असलेल्या एसबीएसपी ने ओबीसी आरक्षणाच्या वाटणीची मागणी केलीय. ओबीसींच्या २७% आरक्षणाची विभागणी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे, अतीदलित अतीमागास समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी ओमप्रकाश राजभर यांनी केली आहे. राजभर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत योगी सरकारवर हल्ला चढवण्याची एकही संधी सोडलेली नाही. ओमप्रकाश राजभर यांनी योगी सरकार वर दबाव बनवण्यासाठी महाराष्ट्रात धाव घेतली आहे. या आधीही उत्तर प्रदेशच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रातून लॉबींग केलं आहे. अखिलेश सिंह यांनी तर नवी मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं होतं. महाराष्ट्रात उत्तरभारतीयांची असलेली लक्षणीय संख्या पाहता आता उत्तरभारतीय नेते आपल्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी महाराष्ट्रात धाव घेत आहेत.

राजभर यांची पनवेल मध्ये रॅली

राजभर यांनी पनवेलच्या खांदा कॉलनी इथे दुपारी ३:३० वाजता कार्यकर्ता संमेलन आयोजित केलं असून उत्तर प्रदेशातील जनतेला मोठ्या प्रमाणात या सम्मेलनात सामील व्हायचं आव्हान केलं आहे. हे संमेलन सरकार वर दबाव बनवण्यासाठी आहे असं मानण्याचं कारण नाही, आम्ही अतीदलित अतीमागास समाजात जागृतीचं काम करायला इथे आलो आहोत असं एसबीएसपी चे प्रवक्ते पियुष मिश्रा यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगीतलं.

आजच्या कार्यकर्ता संमेलनात पक्षाची पुढील रणनिती ठरणार असून राजभर समाज आपलं ऐक्य दाखवून सत्ताधाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्याची भूमिका घेईल, या बैठकीत ओमप्रकाश राजभर काही महत्वाची घोषणा करण्याची शक्यताही पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Updated : 5 Jan 2019 8:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top