Home > मॅक्स रिपोर्ट > आरक्षणाचे फटाके दिवाळीनंतर...

आरक्षणाचे फटाके दिवाळीनंतर...

आरक्षणाचे फटाके दिवाळीनंतर...
X

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगानं आज मुंबई उच्च न्यायालयात प्रगती अहवाल सादर केला असून अंतिम अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यात येणार असल्याने दिवाळीत आरक्षणाचे फटाके फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागासवर्ग आयोगाने आज मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाचा प्रगती अहवाल सादर केला. असून १५ नोव्हेंबर पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुढील चार आठवड्य़ात प्रगती अहवाल सादर करा...

न्यायालयाने मागास वर्ग आयोगाला येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून त्याचबरोबर पुन्हा चार आठवड्यांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे प्रकरण -

गेल्या दोन वर्षांपासून मराठा समाजाने रस्त्यावर उतरत लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. मात्र, दोन महिन्यापूर्वी मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे याची दखल न्यायालयाने घेतली.

मराठा आरक्षणाचा प्रश्नमार्गी लावण्यासाठी विनोद पाटील यांनी याचिका दाखल करत कालमर्यादा ठरवून देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. त्यावर न्यायालयाने लवकरात लवकर हे प्रकरणमार्गी लावण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

Updated : 11 Sep 2018 10:05 AM GMT
Next Story
Share it
Top