Home > News Update > राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी, कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? काय आहे शरद पवारांची चाल?

राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी, कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? काय आहे शरद पवारांची चाल?

राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी, कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? काय आहे शरद पवारांची चाल?
X

येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेच्या ५२ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून 7 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे. त्यामुळे या 7 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूका होत आहे. सहा वर्षांपूर्वी जेव्हा 7 जागांसाठी ही निवड झाली होती. तेव्हा ही निवडणूक बिनविरोध झाली होती. आता याही वेळी ही निवडणूक बिनविरोध होणार की, एखादा जास्तीचा उमेदवार रिंगणात येऊन घोडेबाजाराला ऊत येणार हे देखील पाहावं लागेल.

महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार राज्यसभेवर निवडून जातात. दर दोन वर्षांनी 7, 6 आणि 6 अशा जागा रिक्त होतात. राज्यसभेच्या उमेदवाराची निवडणूक क्रमदेय पद्धतीने होते. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची मतं मिळवण्याची गरज आहे.

निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारा किती मत मिळायला हवीत...?

महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. आणि या आमदारांना एकूण सात खासदारांना निवडून द्यायचे आहे. क्रमदेय पद्धतीमध्ये निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची मत मिळायला हवी. त्यामध्ये मतांचा कोटा तयार केला जातो. क्रमदेय पद्धतीच्या सुत्राप्रमाणे 288/एकूण उमेदारांची संख्या +1 म्हणजे

288/8 = 36 म्हणजे उमेदवारास निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ आमदार राज्यसभेच्या 7 जागांसाठी मतदान करतील. १०५ आमदार भाजपकडे आहेत. तसंच पाच अपक्ष आमदारांचं भाजपला समर्थन आहे. 36 मतांचा कोटा असल्याने ११० मते असलेल्या भाजपला साधारण 3 जागा निश्चित मिळू शकतात. भाजपची 2 मतं शिल्लक राहतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीकडे एकूण १७८ मतं आहेत. त्यामुळं त्यांचे 4 उमेदवार निश्चित निवडूण येऊ शकतात. 4 उमेदवारांसाठी 144 मतांची गरज आहे. त्यामुळं महाविकास आघाडी कडे साधारण अतिरिक्त 34 मतं शिल्लक राहतात. एकंदरीत सर्व राजकीय पक्षाचा विचार केला तर भाजपच्या तीन जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यांची प्रत्येकी एक जागा निश्चित पणे निवडून येऊ शकते. मात्र, खरा प्रश्न हा 7 व्या जागेसाठी आहे. या सातव्या जागेवर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षातील उमेदवाराला संधी दिली जाते. पाहणं महत्वाचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कोठ्यातून सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर जातील. मात्र, पवार त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणता दुसरा उमेदवार देतात हे पाहणं महत्वाचं आहे. राष्ट्रवादीचे खासदार माजीद मेमन निवृत्त होत आहेत. . राष्ट्रवादीची दोन सदस्य निवृत्त होत असल्याने राष्ट्रवादीच दोन जागांवर दावा करु शकते. मात्र, राषट्रवादीचा हा दावा शिवसेना आणि कॉंग्रेस मान्य करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले छत्रपती उदयनराजे भोसले यांची नावं भाजपने जवळ जवळ निश्चित केली आहेत. भाजपने खासदार संजय काकडे आणि अमर साबळे यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय घेत त्यांचा पत्ता कट केल्याचं समजतंय. तसंच शिवसेनेमुळे तिकीट नाकारलेले किरीट सोमय्या, मागच्या वेळी ज्यांना राज्यसभा अर्ज माघारी घ्यावा लागला त्या विजया रहाटकर देखील यावेळी उत्सुक असल्याचं समजतंय. त्यामुळे भाजपच्या वाट्याला असलेल्या तिसऱ्या जागेवर कोणाला संधी दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेची एक जागा निश्चितपणे निवडूण येऊ शकते. कॉंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी या जागेसाठी इच्छुक आहेत. मात्र, शिवसेनेने अद्यापपर्यंत आपला उमेदवार निश्चित केलेला नाही. शिवसेनेने मावळते खासदार राजकुमार धूत यांचा पत्ता कट केल्याचं समजतंय. शिवसेनेचे जुने जाणकार नेते अनंत गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील या नेत्यांपैकी एकाची वर्णी लागावी अशी ज्येष्ठ नेत्यांची मागणी आहे.

काँग्रेसकडून हुसैन दलवाई यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

भारतीय संविधानाच्या कलम 80 नुसार राज्‍यसभेचे 250 सदस्‍य होते. यामध्ये 12 सदस्‍यांची राष्‍ट्रपतींची नेमणूक करतात. बाकी 238 सदस्य संविधानाच्या चौथ्या अनुसूची प्रमाणे प्रत्येक राज्यातील लोकसंख्येच्या आधारे निवडले जातात.

Updated : 20 Feb 2020 1:56 PM GMT
Next Story
Share it
Top