Home > मॅक्स रिपोर्ट > कोकणमधील जमीन परप्रांतीय बळकावत आहे - राज ठाकरे

कोकणमधील जमीन परप्रांतीय बळकावत आहे - राज ठाकरे

कोकणमधील जमीन परप्रांतीय बळकावत आहे - राज ठाकरे
X

राज ठाकरे यांनी मनसेच्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शुक्रवारी सकाळी मार्गदर्शन केले. यावेळी कोकणाच्या जमिनी परप्रांतीय बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केले.

राज ठाकरे म्हणाले, कोकणाने देशाला रत्ने दिली आहेत. पण दुर्दैवाने कोकणच्या पवित्र भूमीकडे दुर्लक्षच होत आहे. राजकारण्यांनीही कोकणाकडे दुर्लक्ष केले असून सर्वसामान्य नागरिकही फक्त गणेशोत्सवापुरताच कोकणात जातो. अॅमेझॉननंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. याचे महत्त्व लक्षात आल्याने अनेक सामाजिक संस्था यावर अभ्यास करत आहेत. या संस्थांना आपण विचारतही नाही, अॅमेझॉननंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत सर्वात मोठी जैवविविधता आहे. याचे महत्त्व सामाजिक संस्थांनाही कळू लागले असून त्यांनी या संदर्भात अभ्यास सुरु केला आहे. दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे दुर्लक्ष केले. कोकणातील जमिनीची वाट लावणारे प्रकल्प लादले जात आहे, कोकण आणि केरळमध्ये साम्य आहे. मग केरळमध्ये जसा पर्यटनाचा विकास झाला तसा विकास कोकणात का नाही झाला?, असासवालत्यांनी यावेळी उपस्थित केला.

Updated : 8 Sep 2018 2:04 PM GMT
Next Story
Share it
Top