Home > मॅक्स रिपोर्ट > संसदेमध्ये राफेल मुद्यावरुन घमासान, राहुल गांधीचा हल्ला बोल

संसदेमध्ये राफेल मुद्यावरुन घमासान, राहुल गांधीचा हल्ला बोल

संसदेमध्ये राफेल मुद्यावरुन घमासान, राहुल गांधीचा हल्ला बोल
X

आज राफेल करारावरती संसदेच्या सभागृहात चर्चा सुरु आहे. लोकसभेत राफेल करारा संदर्भात सुरु असलेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी सहभाग घेतला. राहुल यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.

राहुल गांधींचे सरकारवर आरोप...

मोदी सरकारने भारतीय वायूसेनेला आवश्यक असणाऱ्या बाबींची यादी बदल्याचा आरोप राहुल यांनी या चर्चेत सहभाग घेताना केला.

विमानांची संख्या १२६ वरुन ३६ कशी झाली? तसंच नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुनच अनिल अंबानी यांना कंत्राट दिल्याचा दावा यावेळी राहुल यांनी केला आहे. तसंच या घोटाळ्यायाच्या चौकशीसाठी जेपीसी नेमण्याची मागणी केली.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2120840038227966/

पंतप्रधान राफेलच्या मुद्द्यावर गप्प का ?

जर राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत असाल तर १२३ विमानांची मागणी ३६ विमानांवर का आली ?

या प्रकरणाबाबत मला काही माहिती नव्हतं असं तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रिकर स्वत: म्हणाल्याचा राहुल यांचा दावा

राफेल प्रकरणावर सर्व देश पंतप्रधानांच्या भाष्यावर संशय करत असून एकाही प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही.

राफेलचा जुना करार बदलून नवा करार का करण्यात आला.

राफेलच्या किंमती का वाढल्या ?

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2286442764924700/

Updated : 2 Jan 2019 10:44 AM GMT
Next Story
Share it
Top