Home > मॅक्स रिपोर्ट > पुरग्रस्तांची व्यथा : 'माझ्या पायाचं ऑपरेशन झालंय दोन दिवसांपासून रांगेत उभी आहे, तरी पैसे मिळानात'

पुरग्रस्तांची व्यथा : 'माझ्या पायाचं ऑपरेशन झालंय दोन दिवसांपासून रांगेत उभी आहे, तरी पैसे मिळानात'

पुरग्रस्तांची व्यथा : माझ्या पायाचं ऑपरेशन झालंय दोन दिवसांपासून रांगेत उभी आहे, तरी पैसे मिळानात
X

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाली आहेत, त्यात शासनाने पुरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 5 हजार रुपये रोख आणि 5 हजार रुपये बॅक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रशासनाकडून ही मदत मिळण्यास उशीर होत असल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सर्वच स्थरातून मदत होते.

मात्र, अजूनही कोल्हापूर जिल्हातील कुरून गावातील पुरग्रस्तांना मदतीसाठी २-३ दिवस रांगेत उभे राहावं लागत आहे. गावातील लोक मदत मिळवण्यासाठी दररोज रांगेत उभे राहतायत. गावातील लोकांचं म्हणणं आहे की अजूनही मदत मिळाली नाही. दररोज येतोय मात्र मदत मिळत नाही. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच ही मदत दिली जात आहे. मात्र, तेथील अधिकारी १२ वाजता येऊन ५ वाजता बंद करतात. असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे.

"४ दिवसापासून लोकं यायला लागल्यात, न जेवता लोकं अनुदानासाठी उभं राहतायत, ईतर गावाप्रमाणे सुविधा येथे करावी अशी मागणी गावातील एका नागरिकाने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली आहे. रांगेत नंबर लावण्यासाठी काही लोक रात्री देखील इथेच राहतात.

रांगेत उभा असलेल्या आजींनी सांगितलं की पायाचं ऑपरेशन झालंय तरी २ दिवस रांगेत उभी आहे. अजून पर्यंत पैसे मिळाले नाहीत.

रांगेत उभा असलेल्या लहान मुलाने प्रतिक्रिया देताना "पैसे संपल्यावर अधिकारी अनुदान बंद करत्यात, मी तीन दिवस येतोय आणि रांगेत उभा राहतोय अजूनही नंबर आला नाहीय, रांगेत उभे असल्यामुळे जेवत पण नाही, जेवण करू कुठं सर्व घर पुरात गेलंय. ५००० कोणाला पुरणार आहेत? पुरामुळे सर्व घर घाण झालंय... जर अनुदान नाही घेतलं तर घर कसं चालवायचं, त्यामुळे घर बघावं की अनुदान अशी परिस्थिती इथल्या नागरिकांची झाली आहे. जनावरांसाठी सुद्धा काही खायला नाही, म्हणून रडायला येतं .

सरकारने नियोजन करावं, आम्ही सर्व संसार जमा करतो या पाण्याने सर्व वाहून नेलं, आम्ही असंच दिवस घालवत बसायचं आणि या अनुदानाच्या रांगेत उभं राहायचं का" ?

अशी खंत पुरग्रस्तानी मॅक्समहाराष्ट्रासी बोलताना व्यक्त केली. या गावाला पुराचा तडाखा बसल्याने नागरिकांचे मोठं नुकसान झालं. घरं पडली जनावरं वाहून गेली. होतं नव्हतं गेलं. त्यामुळे शासनाच्या मदतीची आस लागलेली असणाऱ्या या पुरग्रस्तांना दोन ते तीन दिवसापासून 5 हजारासाठी रांगेत उभं राहावं लागत आहे. त्यामुळे शासनाने या पुरग्रस्तांच्या मनातील व्यथा जाणून घेऊन त्यांना रांगेत ताटकळत उभा न ठेवता. तात्काळ मदत करावी.

https://youtu.be/EcssRtXr6ms

Updated : 21 Aug 2019 7:12 AM GMT
Next Story
Share it
Top