Home > मॅक्स रिपोर्ट > शिवस्मारकाच्या जागेसंदर्भात आता 'प्रश्नचिन्ह'?

शिवस्मारकाच्या जागेसंदर्भात आता 'प्रश्नचिन्ह'?

शिवस्मारकाच्या जागेसंदर्भात आता प्रश्नचिन्ह?
X

शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामाचे उद्घाटन करण्यासाठी गेलेली बोट पलटल्यानंतर शिवस्मारकाच्या जागेसंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी शिवस्मारकाची जागा चुकीची असल्याचा आरोप केला आहे.

शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला शिवस्मारक बांधायचा हा एक नविन स्टंट असून येत्या निवडणूकीसाठी करण्यात आलेला हा खटा-टोप आहे. मुळात शिवस्मारकाची जागाच चुकीची आहे. या भागात खडकाळ जागा असल्यामुळे यांची भविष्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती. विनायक मेटे यांनी शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभासाठी घातलेला खटा-टोपामुळे सिद्धेश पवारला जीव गमवावा लागला असा आरोप दामोदर तांडेल यांनी केला आहे.

Updated : 25 Oct 2018 10:57 AM GMT
Next Story
Share it
Top