News Update
Home > Election 2020 > भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या झोपडपट्टीवासियांचा जाहीरनामा

भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या झोपडपट्टीवासियांचा जाहीरनामा

भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या झोपडपट्टीवासियांचा जाहीरनामा
X

भोपाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यात लढत होत असल्याचं चित्र आहे. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधल्या गौतमनगरमध्ये मराठी भाषिक रहिवाशांची संख्या अधिक आहे. मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी गौतमनगरमधील विकासकामं, सोयी-सुविधांचा आढावा घेतल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. स्थानिक भाजप नगरसेवकांना त्यांच्याच वार्डमधील समस्यांवर विचारल्यावर ते मॅक्स महाराष्ट्रवरच भडकले. तर गौतमनगरच्या रहिवाशांना अपेक्षित सुविधाच गेल्या ४० वर्षांमध्ये मिळाल्या नसल्याचा तक्रारीचा सूरही ऐकायला मिळाला. मॅक्स महाराष्ट्रनं इथल्या रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या ‘जनतेचा जाहीरनामा’मधून.

Updated : 8 May 2019 1:56 PM GMT
Next Story
Share it
Top