Home > मॅक्स रिपोर्ट > युपीत गंगा वॉर...

युपीत गंगा वॉर...

युपीत गंगा वॉर...
X

मैं आया नहीं, मुझे गंगा मय्या ने बुलाया हैं, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणूकीचा रंग पालटून टाकला होता. 2019 च्या निवडणूकीच्या रणधुमाळीत आता प्रियंका गांधी गंगा की बेटी म्हणून मैदानात उतरताना दिसत आहेत.

प्रियंका गांधी या तीन दिवसाची 140 किलोमीटरची गंगा यात्रा करत आहेत. प्रयागराज ते वाराणसी अशी ही यात्रा असणार आहे. संगम येथे गंगापूजन केल्यानंतर त्यांनी आपली ही यात्रा सुरू केली आहे. त्याआधी त्यांनी हनुमान मंदिरात पुजा ही केली.

नीडर बनो सब अच्छा होगा

लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजल्यानंतर प्रियंका गांधी यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रियंका गांधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखू शकतात असा विश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस प्रचारात बॅकफूटवर खेळताना दिसतेय. अशा वेळी बदललेल्या परिस्थितीत प्रियंका गांधी काय बोलणार? काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, मात्र, मृदूभाषी प्रियंका गांधी यांनी अजूनपर्यंत मोदींवर काहीही भाष्य केलेलं नाही. तरी सुद्धा प्रियंका यांच्या हल्ल्याचा रोख काय असेल? हे त्यांच्या एका ट्वीट वरून लक्षात येतंय.

प्रियंका गांधी तीन दिवसांची गंगा यात्रा करणार आहेत. या यात्रेपूर्वी त्यांनी स्वराज भवनच्या आठवणी जागवल्या. प्रियांका गांधी यांनी म्हटलंय की..

स्वराज भवनाच्या अंगणात बसून ती खोली पाहतेय, ज्यात माझ्या आजीचा जन्म झाला होता. रात्री झोपवताना आजी मला झोन ऑफ आर्कच्या गोष्टी सांगायची. आज पण माझ्या कानात ते शब्द घुमतात.. ती म्हणायची – नीडर बनो और सब अच्छा होगा.

प्रियांका गांधी यांच्या या वाक्यांवरून त्या पुढे काय करणार आहेत, याचा अंदाज दिसून आलाय.

Updated : 18 March 2019 12:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top