News Update
Home > Election 2020 > प्रणव मुखर्जी यांनी केली निवडणूक आयोगाची प्रशंसा

प्रणव मुखर्जी यांनी केली निवडणूक आयोगाची प्रशंसा

प्रणव मुखर्जी यांनी केली निवडणूक आयोगाची प्रशंसा
X

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधारी भाजप नंतर निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्हच उपस्थित केलं असताना कॉंग्रेसचे माजी नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.

‘निवडणूक आयोगाने अत्यंत योग्य पद्धतीने २०१९ च्या लोकसभा निवडणुका घेतल्या. सुकूमार सेन यांच्यापासून ते विद्यमान निवडणूक आयुक्तांपर्यंत सर्वांनीच चांगल्या पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे भारतात लोकशाही यशस्वी ठरली असं म्हणत विविध निवडणूक आयुक्तांनी योग्य पद्धतीने निवडणुका घेतल्यामुळे भारतात लोकशाही यशस्वी ठरली अशा शब्दात प्रणव मुखर्जींनी आयोगाचे कौतुक केले आहे’.

ते एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात बोलत होते.

Updated : 21 May 2019 10:36 AM GMT
Next Story
Share it
Top