Home > मॅक्स रिपोर्ट > PMC Bank Scam : "जसा तेरा खातेदारांचा मृत्यू झाला तसा माझा ही होईल!’’

PMC Bank Scam : "जसा तेरा खातेदारांचा मृत्यू झाला तसा माझा ही होईल!’’

PMC Bank Scam : जसा तेरा खातेदारांचा मृत्यू झाला तसा माझा ही होईल!’’
X

आर्थिक अडचणीत आलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यानं अनेक लोकांचे कुटूंब अडचणीत आले आहेत. रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध लादल्याने अनेक खातेदारांना पैसे काढणं मुश्कील झालं आहे. बँकेची बुडित कर्ज लपवल्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटीचा तोटा झाला आहे. यांसदर्भात मुंबई पोलिसांच्या इकॉनमिक ऑफेन्स विंगनं (EOW) पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने खातेदारांना पैसे काढण्यास निर्बंध घातल्यानं आत्तापर्य़ंत या धक्क्यात १३ लोकांचा बळी गेला आहे.

अंधेरी पुर्वेतील पुनमनगर मधील 'आशिर्वाद' सोसायटीत राहणाऱ्या अजवानी कुंटुबाचे देखील याच बॅंकेत खाते आहे. हंसा आणि अशोक अजवानी वय वर्ष ७९. या पती -पत्नीचे लाखो रुपये पंजाब महाराष्ट्र बँकेत अङकून आहेत. हंसा यांची ३००० पेंशन येते. अशोक यांची ही पेंशन येते. यावर घर खर्च आणि औषधांचा खर्च भागवत आहे. आयुष्यभराची कमाई मिळेल की नाही? उत्तरत्या वयात अचानक काही होऊ शकतं. मग पैसे आणायचे कुठून ?

हे ही वाचा

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण : चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार

दुष्काळात चारा निर्मितीचा बलवडी पॅटर्न

समृद्धी महामार्गाची चौकशी होणार

अशोक अजवानी यांना अस्थमाचा ञास आहे. त्याचे पाय कमाजोर आहेत. चालताना ञास होतो. वयोमनानूसार शरीर अनेक तक्रारी करत असतं. त्यात पैश्याचा तणाव शांत झोपू देत नाही. अशोक अजवानी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी या संदर्भात बोलताना

"जसा तेरा खातेदारांचा मृत्यू झाला माझा ही एक दिवस होईल, सरकार वर विश्वास राहीला नाही. मोदी सरकारने खातेदारांची बाजू समजून घेतली नाही. अर्थमंञी काय बोलते तिला ही कळतं नाही. आजारी आहे औषधांना पैसे लागतात. पुढचे दिवस कसे निघणार’’ असं म्हणत त्यांनी भविष्याची चिंता व्यक्त केली.

हंसा अजावानी यांना हात जोङत त्या म्हणाल्या

'आमचे पैसे परत करा, म्हातारी असुन ही आंदोलनात गेले आता मी थकले. आयुष्यभर नोकरी करुन पैसे जमवलेले आहेत. ते परत द्या हीच विंनती आहे. आता माझा कुणावर ही विश्वास राहिला नाही. पैसे मिळणार नाही असं वाटतं, आमचा न्याय परमेश्वरच करेन'

पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणात ज्या खातेदारांचे पैसे आहेत ते दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. मात्र, बॅंकेवरील निर्बंध कधी हटवले जाणार याकडे डोळे लावून बसले आहेत.

Updated : 6 Dec 2019 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top