Home > मॅक्स रिपोर्ट > धर्मासाठी केली गौरी लंकेश यांची हत्या!

धर्मासाठी केली गौरी लंकेश यांची हत्या!

धर्मासाठी केली गौरी लंकेश यांची हत्या!
X

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी परशुराम वाघमारे याने गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली दिली आहे. परशुराम वाघमारेची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीत त्याने गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा कबुलीजबाब दिला, असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. ‘मे २०१७ मध्ये मला सांगण्यात आले की धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे. मीदेखील त्यासाठी तयार झालो. मात्र, आता मला असे वाटते की मी एका महिलेची हत्या करायला नको होती’, असे परशुरामने पोलिसांना सांगितले आहे.

काय आहे आरोपी परशुरामचा कबुली जबाब…?

‘मे २०१७ मध्ये मला सांगण्यात आले की धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे. मीदेखील त्यासाठी तयार झालो. ज्याला मारायचे आहे, त्या व्यक्तीविषयी मला काहीच माहिती नव्हती, असा कबुलीजबाब परशुरामने पोलिसांना दिला आहे.

असा रचला कट?

५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येसंदर्भात पूर्ण माहिती परशुराम वाघमारेने पोलिसांना दिली आहे. ‘३ सप्टेंबर रोजी मला बेंगळुरुत नेण्यात आले. या अगोदर मला बेळगावात एअरगनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले होते’, असे परशुरामने पोलिसांना सांगितले. हत्येच्या अगोदर तीन वेळा तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी दुचाकीवरुन गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात नेले होते, अशी माहिती परशुरामने दिली आहे. मात्र गौरी लंकेश यांच्या हत्ये मागे खरा कोणाचा हात होता? हे अद्यापर्यंत समोर आलेले नाही.

Updated : 16 Jun 2018 8:52 AM GMT
Next Story
Share it
Top