Top
Home > Max Political > पंकजा मुंडेचं अखेर ठरलं...!

पंकजा मुंडेचं अखेर ठरलं...!

पंकजा मुंडेचं अखेर ठरलं...!
X

हातातून गेलेली सत्ता आणि भाजपमधील अस्वस्थता यामुळे भाजप मध्ये ब-याच खळबळजनक गोष्टी येत्या काळात बाहेर येतील. त्यात पंकजा मुंडे यांचा पुढचा राजकीय प्रवासही असणार आहे. यांचं कारण पंकजा मुंडे आज पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहील्या नाहीत. प्रकृत्ती ठीक नसल्याचं कारण पंकजा मुंडे यांनी दिलं असलं तरी त्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गड इथं होणा-या मेळाव्याची जोरात तयारी करत असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं.

आज औरंगाबाद इथं भाजपची मराठवाड्याची विभागीय बैठक होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मराठवाड्यातील भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित असताना पंकजा मुंडे मात्र, या बैठकीला उपस्थित नव्हत्या.

त्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले. नंतर मात्र, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. पंकजा मुंडे यांची तब्येत ठीक नसल्यानं त्या उपस्थित राहणार नाही असं त्यांनी कळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा…

किरीट सोमय्या पुन्हा उध्दव ठाकरेंवर बरसले कोर्टात काय उत्तर देणार सरकार

‘ते’ दोघं पुन्हा एकत्र आले!

एकनाथ खडसे शरद पवार यांच्या भेटीला चर्चा सुरू

पंकजा मुंडे काल मुंबईत होत्या आणि आजही त्या मुंबईत होत्या. काल त्यांनी इनस्ट्राग्रामवर त्यांनी कौटुंबिक फोटोही शेअर केला होता. रविवारी दुपारी त्या जेवायला जात असल्याचा तो फोटो होता. तर माजी मंत्री प्रकाश मेहता त्यांना रॉयल स्टोन या निवासस्थानी भेटायलाही गेले होते.

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी खुद्द भाजपमधील नेते सक्रिय होते असं पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. तर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही हीच बाब जाहीररित्या व्यक्त केली होती.

पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा आहे. तशी त्यांनी अनेकवेळा व्यक्तही केली आहे. पण त्यांच्या महत्वाकांक्षेला भाजपमधूनच खिळ बसली आहे. देवेन्द्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ नये म्हणून त्यांचा पराभव केला असल्याची कुजबुज भाजपमध्ये आहे.

अस्वस्थ झालेल्या पंकजा मुंडे यांनी आपण काही दिवस आत्मचिंतन करणार आहोत आणि 12 डिसेंबरला बोलणार आहोत. असं घोषित केलं होतं. अशा आशयाची एक पोस्ट त्यांनी फेसबुकला टाकली होती. कार्यकर्त्यांकडून सूचना ऐकून काही वेगळा विचार करायचा का? हे त्यांनी सगळ्यांना 12 तारखेला सांगेन असं त्या म्हणाल्या होत्या.

त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज औरंगाबादची बैठक का टाळली? याची चर्चा सुरू झाली आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांनी आपला रस्ता निवडला असून भाजपमध्ये ज्यांनी त्यांना त्रास दिला. त्यांना उत्तर देण्याची रणनिती ठरवली आहे. भाजपमधील नाराज नेत्यांची आणि गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांची एकी करून पुढचा प्रवास करायचा आणि तोही आक्रमकरित्या असे ठरले आहे.

त्याच पार्श्वभूमिवर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येतं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर माजी आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे यांचं चांगलं असलं तरी पंकजा मुंडे यांचा स्वभाव पाहता शिवसेनेत त्यांना फारसं भवितव्य नसेल. असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Updated : 9 Dec 2019 4:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top