Home > मॅक्स रिपोर्ट > पाकिस्तानच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना हल्ल्याची माहिती कशी...

पाकिस्तानच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना हल्ल्याची माहिती कशी...

पाकिस्तानी चॅनेल्सवर भारतात फिदाईन हल्ल्यांना सुरूवात होईल अशा आशयाच्या चर्चा सतत होत असतात. अशाच एका चर्चेमध्ये पाकिस्तानच्या माजी लष्करी अधिकाऱ्याने भारतात यापुढे आत्मघाती हल्ले होतील, कश्मिरी युवकांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात तिथला तरूण बंड करेल असं मत व्यक्त केलं होतं.

भारतात अतिरेकी कारवायांमध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचं भारताने वेळोवेळी सिद्ध केलं आहे. पाकिस्तानी माध्यमं तसंच सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात भारत विरोधी मोहीमा चालवल्या जातात, मात्र थेट हल्ल्याची कार्यपद्धती सांगणाऱ्या या व्हिडीयोमुळे खळबळ माजली आहे. या व्हिडीयोचा वापर पुरावा म्हणून केला जावा अशी मागणी आता होत आहे. पाहा हा व्हिडीओ...

https://twitter.com/majorgauravarya/status/1096254497301635072?s=12

Updated : 15 Feb 2019 10:27 AM GMT
Next Story
Share it
Top