Home > मॅक्स रिपोर्ट > कोणत्या मुद्यांवर मोदींनी साधली चुप्पी?

कोणत्या मुद्यांवर मोदींनी साधली चुप्पी?

कोणत्या मुद्यांवर मोदींनी साधली चुप्पी?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना महत्वाच्या मुद्यांवर चुप्पी साधली. काय आहेत हे मुद्दे ज्या मुद्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी टाळला...

राफेल करार

भारतीय वायुदलाची लढाऊ विमानांची संख्या आणि गरज लक्षात घेता भारताने ३६ लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. गेल्या अनेत वर्षापासून या विमान खरेदीची चर्चा सुरू होती. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर यामध्ये काही बदल करत या विमानाची खरेदी करण्यात आली, मात्र यामध्ये काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावर पंतप्रधान बोलायचे नेहमीच टाळतात.

आज पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बोफोर्सचा उल्लेख केला मात्र, राफेल विमान खरेदीचा उल्लेख केला नाही.राफेल संदर्भातील नव्या करारात विमानांची खरेदी किंमत वाढवली की नाही?

राफेल विमाने तयार करण्याची जबाबदारी कोणाची?

सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉक्टिक्स लिमिटेड या कंपनीला याचे कंत्राट देण्याऐवजी खाजगी कंपन्यांना का दिले?

रोजगार

  • मोदींनी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले?
  • बेरोजगारीच्या मुद्द्यावर मोदींनी बेईमान असलेले लोक बेरोजगार आहे, असं म्हणत बेरोजगारांच्या दुखा:वर मीठ चोळले मात्र कुठेही बेरोजगारांसाठी काय करता येईल याचा उल्लेख नाही केला नाही.
  • देशातील औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत आहेत, देशातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या कशा देणार यावर पंतप्रधानांनी बोलायचे टाळले.

शेती

  • शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, यासंदर्भात मोदींनी एकही ब्र शब्द काढला नाही.
  • शेतकरी कर्जमाफी बाबत देखील मोदींनी बोलण्याचे टाळले
  • हमीभाव दीडपट दिला जाईल असं बोलले जातं आहे, मात्र हा हमीभाव कोणत्या किंमतीच्या दिडपट दिला जाईल या संदर्भात स्पष्ट उल्लेख नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.

१५ लाखांचे काय झाले?

निवडणुकीपुर्वी प्रत्येकांच्या बँकेच्या खात्यात १५ लाख रुपये येणार होते याचे काय झाले? यावरही मोदींनी बोलणे टाळले.

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’चे काय झाले?

‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असं म्हणत सत्तेत आलेले मोदींना आता त्यांच्याच वाक्याचा विसर पडला की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही कारण अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्या कंपनीचा अचानक वाढलेल्या टर्नओव्हरबाबत अमित शहा काहीच बोलत नाही.

कश्मिर प्रश्नांबद्दल बोलणे का टाळले?

कश्मिरमध्ये दररोज आपले जवान शहिद होत असताना, सरकारची याबाबत काय निती आहे? याबाबत बोलण्याचे टाळत पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधून वेळ मारून नेली.

अशा अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांनी चुप्पी का साधली की जे मुद्दे देशाच्या भवितव्याशी निगडीत आहेत.

Updated : 7 Feb 2018 1:36 PM GMT
Next Story
Share it
Top