Home > मॅक्स रिपोर्ट > पंतप्रधान पदावर असताना आई झाल्याचा आनंद….

पंतप्रधान पदावर असताना आई झाल्याचा आनंद….

पंतप्रधान पदावर असताना आई झाल्याचा आनंद….
X

वेलिंग्टन, ता. २१ जून : न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन आई झाल्या आहेत. त्यांना मुलगी झाली असून तसा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पंतप्रधानपदावर असताना आई होणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत.

३७ वर्षांच्या जॅसिंडा ऑर्डन यांनी सहा आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह घेतली असून उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स हे प्रभारी पंतप्रधान म्हणून कार्यभार बघत आहेत. सर्व जगभरातून मिळत असलेल्या शुभेच्छांमुळे भारावून गेल्याचं ऑर्डन यांनी म्हटलं आहे.

इतर पालकांसारखच आम्हीही एका वेगळ्या आनंदाचा अनुभव घेत आहोत. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवादही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहेत. या आधी १९९० मध्ये बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान असताना त्या आई बनल्या होत्या. त्यांनाही मुलगी झाली होती. पंतप्रधानपदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या पहिल्याच नेत्या होत्या.

देशाचं प्रमुखपद भूषवत असताना घर आणि ऑफिस सांभाळत काम करणे हे तारेवरची कसरत असते. मात्र या नेत्यांनी तेवढ्याच सक्षमपणे देशाचा कारभार चालवत असताना आपलं आईपणही जपत आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत.

Updated : 23 Jun 2018 12:00 PM GMT
Next Story
Share it
Top