Home > Election 2020 > मायावतीं ची 'माया' गुलदस्त्यात, तर अखिलेश यांच्या सायकलचे कॉंग्रेसला समर्थन

मायावतीं ची 'माया' गुलदस्त्यात, तर अखिलेश यांच्या सायकलचे कॉंग्रेसला समर्थन

मायावतीं ची माया गुलदस्त्यात, तर अखिलेश यांच्या सायकलचे कॉंग्रेसला समर्थन
X

लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पार पडले असून आता २३ मेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. एग्जिट पोलचे आकडे एनडीएला बहुमत दाखवत असले तरी विरोधी पक्षाच्या वतीनं दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीला बसपा प्रमुख मायावती उपस्थित राहणार नसल्याचं बसपाचे महासचिव सतीश मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गरज पडल्यास कॉंग्रेसला पाठिंबा देऊ असं जाहीर केलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा असून सपा आणि बसपा यांच्या महागठबंधनला जर ५० ते ६० जागा मिळाल्या तर एनडीएला निश्चितच फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं सपा बसपाच्या या जागा महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे. कदाचित या जागा देशाचा पंतप्रधान ठरवतील म्हणून 'कर्नाटक प्लॅन'च्या धरतीवर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू प्रयत्न करत आहेत. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्याचं मायावती यांनी टाळलं आहे.

आज चंद्राबाबू नायडू, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मायावतींची भेट घेणार होते. मात्र, मायावती यांनी या बैठकीला नकार देत वेट & वॉचची भूमिका घेतली असून २३ तारखेपर्यत आपले पत्ते उघड करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Updated : 20 May 2019 4:38 AM GMT
Next Story
Share it
Top