Home > मॅक्स रिपोर्ट > मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर दहा गाड्यांचा विचित्र अपघात

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर दहा गाड्यांचा विचित्र अपघात

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर दहा गाड्यांचा विचित्र अपघात
X

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली फुडमाॅल जवळील उतारावर दहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कसलिही जिवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा विचित्र अपघात झाला.

खंडाळा बोरघाटातील तीव्र उतारावर वाहनचालकांचा गाडीवरील ताबा सुटल्याने पाच कार, चार ट्रक व टेम्पो अशी दहा वाहने एकमेकावर आदळली व हा अपघात झाला. सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस यंत्रणा, आयआरबीचे कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला आले. या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करत वाहतुक सुरळीत केली.

Updated : 6 Sep 2018 9:08 AM GMT
Next Story
Share it
Top