Home > मॅक्स रिपोर्ट > सावधान! हा गेम घेऊ शकतो तुमच्या मुलाचा जीव

सावधान! हा गेम घेऊ शकतो तुमच्या मुलाचा जीव

सावधान! हा गेम घेऊ शकतो तुमच्या मुलाचा जीव
X

तुमचा मुलगा जर गेम खेळत असेल तर हे नक्की वाचा: 2016 मध्ये, ज्या ब्लू व्हेल गेमने संपूर्ण जगामध्ये दहशत पसरविली होती. ज्या गेमचा आपल्या देशावर देखील परिणाम झाला. जगभरातील या खेळामुळे, अनेक लोकांचा मृत्यू झाला. संपुर्ण जगात ‘ब्लू व्हेल’ या सोशल मीडियावरच्या गेमने अनेक तरूणांचा जीव घेतला. ज्याने संपुर्ण जगभरात हाहाकार पसरला होता. नंतर या गेमला बंद करण्यात आले. परत आता या ‘ब्लू व्हेल’ गेमसारखा ‘मोमो’ चॅलेंज हा गेम भारतात आलेला आहे. या ‘मोमो’ चॅलेंजने भारतात धुमाकूळ घातलाय.

काय आहे हा खेळ?

मोमो’ चॅलेंज या जीवघेण्या गेममूळे भारतातला पहिला बळी राजस्थानमध्ये झाला आहे. राजस्थानातमधील 10 वीतल्या विद्यार्थीनीने ‘मोमो’ गेमच्या नादी लागून 31 जुलैला आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर देशाला या महाभयानक गेमची तिव्रता समजली. घरात कुणी नसताना खोलीतल्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. तिच्या शरीरावरच्या जखमा या मोमोच्या आहेत असंही स्पष्ट झालंय. या घटनेनं तीच्या कुटूंबियांना प्रचंड धक्का बसला आहे.

सोशल मीडिया आणि व्हॉटस्अॅपवरील हा गेम लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहे. ब्लू व्हेल चॅलेंजप्रमाणे मोमो गेम हा व्हॉटस्अॅपवर लोकांच्या जीवाशी खेळत आहे. मोमो व्हॉटस्अॅप एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्अॅपवर शेअर केला जात आहे. हा नंबर जोडल्यानंतर चित्रातील चेहरा धडकी भरवणारा दिसतो. हा नंबर जोडल्यानंतर, अशी अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांवर आत्महत्या करण्यासाठी हळूहळू उत्तेजित करतात. ब्ल्यू व्हेल म्हणा किंवा मोमो असो, या गेम्सचा अंतिम टप्पा आत्महत्या आहे, याची पुरेपूर माहिती असतानाही, तसेच त्यातील आव्हान स्वीकारण्यापूर्वी आपल्याला अशा प्रकारच्या जीवघेण्या सूचना कुणाकडून तरी मिळणार आहेत, हे माहीत असूनही मुले याला बळी पडत आहेत.

Updated : 19 Aug 2018 6:48 PM GMT
Next Story
Share it
Top