Home > मॅक्स रिपोर्ट > गडकरींना नेहरुंचं 'ते' भाषण आवडतं...

गडकरींना नेहरुंचं 'ते' भाषण आवडतं...

गडकरींना नेहरुंचं ते भाषण आवडतं...
X

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरुंवर वारंवार टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, त्याच पंडीत नेहरुंची केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एका जाहीर भाषणात कौतुक केले आहे. त्यामुळे गडकरींचा हा मोदींवर निशाणा होता का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

काय म्हणाले गडकरी?

सहिष्णुता भारताची सर्वांत मोठी देणं असून ही आपल्या व्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे एखाद्याने चुकीचं केलं तर आपणही त्याला तशीच प्रतिक्रया द्यायची ही मानसिकता ठीक नाही. नेहरुंनी म्हटले होते की, भारत एक देश नाही तर लोकसंख्या आहे. जर आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढू शकत नसू तर आपल्याला या समस्येचा भागही बनता कामा नये, हे नेहरुंचं भाषण आपल्याला फार आवडतं असं नेहरु यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1077421457003724801

दरम्यान गडकरींची गेल्या काही दिवसातील वक्तव्य पाहाता गडकरी सध्या भाजपच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Updated : 25 Dec 2018 9:28 AM GMT
Next Story
Share it
Top